शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका मुख्यालयात तंबाखू, माव्याला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:28 IST

सांगली महापालिकेच्या मुख्य इमारतीतच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या अस्वच्छतेचा अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोरच पंचनामा केला. थोरात यांच्या पंचनाम्यानंतर प्रशासनाला जाग आली. मुख्यालयात तंबाखू, मावा व इतर तंबाखुजन्य पदार्थ घेऊन येण्यास बंदी घालणारा आदेशच उपायुक्त स्मृती पाटील यांनी दुपारी काढला.

ठळक मुद्देसांगली महापालिका मुख्यालयात तंबाखू, माव्याला बंदीउपायुक्तांचे आदेश : योगेंद्र थोरात यांच्या पंचनाम्यानंतर जाग

सांगली : महापालिकेच्या मुख्य इमारतीतच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या अस्वच्छतेचा अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोरच पंचनामा केला. थोरात यांच्या पंचनाम्यानंतर प्रशासनाला जाग आली. मुख्यालयात तंबाखू, मावा व इतर तंबाखुजन्य पदार्थ घेऊन येण्यास बंदी घालणारा आदेशच उपायुक्त स्मृती पाटील यांनी दुपारी काढला.महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौरांसह सर्व प्रमुख कार्यालये आहेत. या कार्यालयांलगतच प्रसाधनगृह आहे. बुधवारी तिथे तीव्र दुर्गंधी पसरली होती. नगरसेवक थोरात यांनी यापूर्वीही प्रसाधनगृहातील दुर्गंधीबाबत तक्रार केली होती. पण त्याची दखल घेतली गेली नाही.

बुधवारी त्यांनी आक्रमक होत सहायक आयुक्त दिलीप घोरपडे व स्वच्छता कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून मुख्यालयातील अस्वच्छतेचा पंचानामाच केला. मुख्यालयाच्या मागील बाजूला ड्रेनेज पाईप तुटलेली होती. पाण्याच्या टाकीतून गळती सुरू होती. इमारतीतील खिडक्या पिचकाऱ्यांनी लाल झाल्या होत्या. औषध फवारणी नसल्याने डासही वाढले होते. हा प्रकार थोरात यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.थोरात म्हणाले की महापालिका मुख्यालय प्रभाग १६ मध्ये येते. या प्रभागात स्वच्छतेसाठी तब्बल ७० कर्मचारी आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून एकही कर्मचारी मी स्वच्छतेच्या कार्यात पाहिला नाही. शहर स्वच्छतेची टिमकी प्रशासन वाजवित असताना, मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सहायक आयुक्त घोरपडे यांनी अस्वच्छतेची कबुली देत, लवकरच स्वच्छता करण्याची ग्वाही दिली.थोरात यांनी अस्वच्छतेचा पंचनामा केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. उपायुक्त स्मृती पाटील यांनाही याबाबत माहिती दिली गेली. त्यांनी तातडीने महापालिका मुख्यालयासह सर्वच इमारतीत तंबाखुजन्य पदार्थ आणण्यास बंदी घालण्याचा आदेश काढला. मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना प्रवेश द्यावा, ज्यांच्याकडे तंबाखुजन्य पदार्थ आढळतील, ते जप्त करावेत, प्रसंगी एक हजार रुपये दंडही करावा, असा सूचना त्यांनी दिल्या.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली