शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू, ताकारी, म्हैसाळ दोन वर्षात पूर्ण करणार-- गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:34 IST

सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारने पंधरा वर्षात टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या सुधारित खर्चास मंजुरी दिली नाही. पण ते काम आम्ही तीन वर्षात पूर्ण करून दाखविले.

ठळक मुद्देपाच हजार कोटींची तरतूद; आघाडी सरकारला जमले नाही ते आम्ही करून दाखविले!तीन वर्षात सिंचन योजनांच्या सुधारित खर्चासमंजुरी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारने पंधरा वर्षात टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या सुधारित खर्चास मंजुरी दिली नाही. पण ते काम आम्ही तीन वर्षात पूर्ण करून दाखविले. जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी पाच हजार कोटींची तरतूदही केली असून येत्या दोन वर्षात कामे पूर्ण होतील, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सांगलीत व्यक्त केला.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळीराजा अ‍ॅप, शुध्द पाणी एटीएम आणि आॅनलाईन बेदाणा विक्रीचा प्रारंभ जलसंपदामंत्री महाजन यांच्याहस्ते झाला, यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत, माजी आमदार रमेश शेंडगे, संचालक दिनकर पाटील, बाळासाहेब बंडगर, भानुदास पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, गोपाळ मर्दा, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कुमार पाटील, अभिजित चव्हाण प्रमुख उपस्थित होते.गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पंधरा वर्षे सलग सत्तेवर होते. तरीही त्यांनी सिंचन योजनांना, सुधारित प्रशासकीय कामांना मंजुरीच न दिल्यामुळे योजनांची कामे पूर्ण झाली नाहीत. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर, शेतकºयांच्या हितासाठी सिंचन योजना पूर्ण झाल्या पाहिजेत, अशी भूमिका घेतली. राज्यातील ६० ते ६५ सिंचन योजनांची कामे ठप्प झाली होती. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू उपसा सिंचन योजनांचाही समावेश होता. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शेतकºयांच्या हिताला आम्ही प्राधान्य दिले. अपूर्ण योजनांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली. या कामासाठी पाच हजार कोटीच्या निधीचीही तरतूद केली आहे. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंचन योजनांची शंभर टक्के कामे पूर्ण होतील.

ते म्हणाले की, सध्याच्या उपलब्ध पाण्यावर शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे सिंचन योजनांचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे देण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात टेंभू योजनेची निवड केली आहे.बंद पाईपलाईन आणि शंभर टक्के ठिबक सिंचन करण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के शेतीला पाणी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. बाजार समितीला जागेची अडचण असून, तो प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांनी केली. बाजार समितीचे उपसभापती रामगोंडा संती यांनी आभार मानले.सांगलीत बेदाणा, हळद निर्यात केंद्र सुरू करणारसांगलीत बेदाणा, हळद आणि गुळाची हजारो कोटींची वार्षिक उलाढाल असतानाही, येथे निर्यात केंद्र नाही. त्यामुळे सांगली बाजार समितीने निर्यात कक्षाचा प्रस्ताव पणन विभागाकडे पाठवून द्यावा, त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी घोषण कृषी व पणन राज्यमंत्री खोत यांनी यावेळी केली.संजयकाकांकडून अजितराव घोरपडेंवर टीकास्त्रमाजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बाजार समितीमधील कर्मचाºयांच्या पदोन्नतीमधील फरकाच्या रकमेवरून संचालक मंडळावर टीका केली होती. पणन संचालकांकडेही तक्रार केली होती. हाच धागा पकडून खा. संजयकाका पाटील यांनी भाषणात घोरपडेंचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, मी म्हणेल तसाच कारभार झाला पाहिजे, अशा मानसिकतेत काही नेते आहेत. त्यांचे ऐकले नाही की लगेच, संस्था वाईट म्हणून टार्गेट करण्याची वृत्ती संकुचित आहे. यापुढे संस्था चांगल्या चालण्यासाठी संजयकाका छातीचा कोट करून पुढे असेल. ‘आ. पतंगराव कदमसाहेब, तुम्ही आहात ना माझ्याबरोबर?’, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. कदम यांनीही, गिरीश महाजनांच्या साक्षीने ‘मी तुमच्याबरोबरच आहे’, असे सांगितले.मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांचा सत्कार करू : कदमदुष्काळग्रस्तांच्यादृष्टीने टेंभू, ताकारी, म्हैसाळ सिंचन योजना फार महत्त्वाच्या आहेत. सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न केले. पण, यश आले नाही.या योजनांच्या सुधारित खर्चाच्याप्रशासकीय मान्यतेसाठी मी एकदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना भेटलो. त्यांनी तातडीच्या बैठका लावून तीन वर्षात सिंचन योजनांच्या सुधारित खर्चासमंजुरी दिली.त्यामुळे दुष्काळग्रस्तांतर्फे सांगलीत फडणवीस व महाजन यांचा सत्कार करणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी जाहीर करताच, कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. भाजपचे कार्यकर्ते आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या चेहºयावरील आनंद मात्र ओसंडून वाहत होता.