शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कोरेगावात २९ कुटुंबांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: December 5, 2014 23:20 IST

कुंभार समाजावर अन्याय : ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांकडून वंशपरंपरागत जमीन हडपण्याचा प्रकार

युनूस शेख - इस्लामपूर -कोरेगाव (ता. वाळवा) येथील गायरान जमिनीतील सहा एकर क्षेत्रामधील कुंभार समाजाची वंशपरंपरागत कब्जे वहिवाट, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली खंडित करण्याचा घाट कोरेगाव ग्रामपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांनी घातल्याचा आरोप कुंभार समाजबांधवांनी केला. समाजाच्या उपजीविकेचे साधन असलेले व्यवसाय बंद करुन २९ कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. या जागेवर १९८१ पूर्वीपासून कुंभार समाजाची वंशपरंपरागत कब्जे वहिवाट आहे. याठिकाणी वीटभट्टी, माठ बनविणे असे व्यवसाय केले जात आहेत. तहसीलदारांनी ३0 डिसेंबर १९८१ च्या पत्राने या जागेला बिनशेती परवाना दिला आहे. जागा देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून अतिक्रमणे नियमित करण्यासाठी जुलै ९८ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर नोटीस प्रसिध्द केली होती. तसेच १९८५ मध्ये ग्रामपंचायतीमधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी कुंभार समाजास पारंपरिक व्यवसाय करण्याकरिता ना हरकत दाखलाही दिला आहे. हे क्षेत्र जलसिंचन प्रकल्पाखालील जलप्रदाय क्षेत्राखाली येत नसल्याबाबतचा ना हरकत दिला आहे, असे पत्र कोल्हापूर पाटबंधारे विभागाने तहसीलदारांना दिले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीही ही जागा कुंभार व्यवसायास आरोग्यदृष्ट्या योग्य असल्याबाबतचा दाखला दिला आहे. तसेच तालुका भूमिअभिलेखच्या निरीक्षकांनी या जागेत २९ कुटुंबांची वहिवाट असल्याचा नकाशाही तयार करुन दिला आहे.त्यावर हा प्रस्ताव शासनाकडे गेल्यानंतर ही जागा पारंपरिक व्यवसायाकरिता अग्रक्रमाने जमीन मंजूर करण्याबाबत शासनाने आदेश दिले होते. त्यामुळे मार्च २००० मध्ये २५ कुटुंबांनी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे शासनाकडे ५0 हजारांची दंडनीय रक्कम जमा केली आहे. या सर्व प्रक्रियेनंतर जागा मागणी प्रस्ताव व नकाशाप्रमाणे दंडनीय रकमा भरलेल्या कुंभार समाजातील कुटुंबांची नोंद सात-बारा उताऱ्यावर होण्यासाठी मागणी केली आहे. ती गेल्या ११ वर्षांपासून महसूल विभागाकडे प्रलंबित आहे.कोरेगाव ग्रामपंचायतीमधील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी गावठाण विस्तार व विकासाच्या नावाखाली या जागेतील अतिक्रमणे हटविण्याचा डाव आखला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या खेळामुळे गावातील २९ कुटुंबातील १७१ व्यक्तींवर उपासमारीची वेळ येणार आहे. ही जागा गावठाण असून शासनाच्या नावावर आहे. कुंभार समाजाला जागा दिल्याचा कोणताही अंतिम आदेश अद्यापपर्यंत प्राप्त नाही. मंत्रालय स्तरावर हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या जागेतील अतिक्रमणांबाबत वरिष्ठांकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी या जागेतील सर्वच समाजघटकांची अतिक्रमणे काढली जाणार आहेत.- अमर साळुंखे, तलाठी, कोरेगाव.जयंत पाटील यांचे दुर्लक्षकोरेगाव हे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील गाव. संपूर्ण कुंभार समाज त्यांच्या पाठीशी राहतो. पण १५ वर्षे मंत्री असतानाही त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष का केले, याचे कोडे उलगडत नाही. पाटील यांचे दुर्लक्ष ग्रामपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांना बळ देणारे आहे का?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.