शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत रुग्णांवर रस्त्यावर मरण्याची वेळ : शरद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 14:34 IST

कोरोनाच्या उद्रेकाबद्दल प्रशासनाला कल्पना असूनही त्यांनी योग्य उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सांगलीत उपचाराविना रुग्णांना रस्त्यावर मरण्याची वेळ आली आहे, अशी टीका जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देसांगलीत रुग्णांवर रस्त्यावर मरण्याची वेळ : शरद पाटीलउपाय करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

सांगली : कोरोनाच्या उद्रेकाबद्दल प्रशासनाला कल्पना असूनही त्यांनी योग्य उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सांगलीत उपचाराविना रुग्णांना रस्त्यावर मरण्याची वेळ आली आहे, अशी टीका जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, सांगली जिल्हयात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्हयाला वैद्यकीय सेवेची १२५ वर्षांची परंपरा असून सांगली-मिरज शहरांना वैद्यकीय पंढरी म्हणून जगभर ओळखले जाते. १२५ वषार्पूर्वी डॉ. विल्यम वान्लेस यांनी ज्या परिसरात वैद्यकीय सेवेचा पाया घातला आणि केवळ देशातील नव्हे तर परेदशातही अनेक दुर्धर रोगाने ग्रस्त असलेले रुग्ण मिरजेमध्ये येऊन उपचार घेऊन बरे व्हायचे. परंतु कोरोना साथीचा प्रसार रोखण्यामध्ये आणि कोरोना बाधितांवर उपचार करण्यामध्ये सांगली जिल्हयाचे काम परंपरेला साजेसे राहिले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.ते म्हणाले की, राजकीय नेतृत्वाने आणि प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य धोका ओळखून या साथीचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुरूच ठेवली नाही, त्यामुळे आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये दोन शासकीय सर्वोपचार रुग्णालये, एक वान्लेस हॉस्पिटल अशी सर्व रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता असलेली रुग्णालये असताना, दहा बेडस, पन्नास बेडस असणाऱ्या रुग्णालय किंवा मंगल कार्यालयामध्ये उपचार सुरु करण्यात धन्यता मानली. काही खासगी रुग्णालयांनी या संधीचा फायदा घेऊन रुग्णांची प्रचंड लूट सुरु केली.व्हेन्टीलेटरची संख्या अपुरी असल्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराविना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक रुग्ण एका हॉस्पिटलकडून दुसऱ्या हॉस्पिटलकडे प्रवेशासाठी फेऱ्या मारतच मृत्यूमुखी पडताहेत व प्रशासन मात्र ठप्प आहे. यंत्रणेत सुधारणा न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी अ‍ॅड. के. डी. शिंदे, शशिकांत गायकवाड, जनार्दन गोंधळी उपस्थित होते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली