शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘पीडब्ल्यूडी’ला तीन स्मरणपत्रे : ‘पाटबंधारे’च्या मान्यतेविना हरिपूर पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 01:08 IST

महापुराचे पाणी हरिपूर गावात शिरले होते. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्यातच पुलाला जोडणाºया रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्याने शेतजमिनी व घरे बाधित होण्याची भीती ग्रामस्थांना आहे. हरिपूर ग्रामस्थांनी याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडेही तक्रार केली आहे. या पुलाचे काम रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देआराखड्याचा जलशास्त्रीय अभ्यास आवश्यक

सांगली : हरिपूर-कोथळी पुलाचा बांधकाम आराखडा अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाटबंधारे विभागाच्या मान्यतेसाठी सादर केलेला नाही. याबाबत पाटबंधारे विभागाने तीनदा स्मरण पत्रही पाठविले आहे. त्यातच आता भविष्यात पुलामुळे काही अडचण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकामवरच राहील, असे पत्र पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांनी दिले आहे.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या हरिपूर-कोथळी पुलाचे काम सध्या जोरात सुरू आहे. त्यासाठी २५ कोटींचा खर्च होणार आहे. कोथळी गावाच्या बाजूने पुलाचे काम सुरू आहे. आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर हरिपूर ग्रामस्थांनी या पुलाला विरोध केला. महापुराचे पाणी हरिपूर गावात शिरले होते. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्यातच पुलाला जोडणाºया रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्याने शेतजमिनी व घरे बाधित होण्याची भीती ग्रामस्थांना आहे. हरिपूर ग्रामस्थांनी याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडेही तक्रार केली आहे. या पुलाचे काम रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, पुलाच्या बांधकाम आराखड्याला पाटबंधारे विभागाची मान्यता घेतली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तीन स्मरणपत्रेही पाठविली आहेत. जानेवारी महिन्यात पाटबंधारेच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी पुन्हा पत्र पाठविले. त्यात सांगलीच्या कृष्णा नदीवरील प्रस्तावित आयर्विन व हरिपूर-कोथळी पुलाचा सविस्तर आराखडा, जलशास्त्रीय अभ्यास व प्रस्तावित पुलामुळे नदीतील पाण्यास निर्माण होणारा अडथळा आदींची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. पुलाचा जलशास्त्रीय अभ्यासास जलसंपदा खात्याकडून मान्यता घेणे आवश्यक आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती प्राप्त न झाल्यास भविष्यात काही अडचणी उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या खात्यावर राहील, असेही म्हटले होते. या पत्रानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा सादर केलेला नसल्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

मान्यता घेणे आवश्यक : नामदेव करेपाटबंधारे विभागाकडून हरिपूर-कोथळी पुलाचा आराखडा व जलशास्त्रीय डाटा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अद्याप आराखडा पाटबंधारे विभागाकडे आलेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर नाशिक येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून त्याची तपासणी करून घेतली जाईल. त्यात काही त्रुटी असतील तर, त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या जातील. सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करणारी यंत्रणा आहे. तेही जलशास्त्राचा अभ्यास करूनच आराखडा तयार करतात. तरीही पाटबंधारेची मान्यता घेणे आवश्यक आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी दिली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाfloodपूरSangliसांगलीpwdसार्वजनिक बांधकाम विभाग