शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम, एशियन बुकसह तीन संस्थांकडे नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 16:09 IST

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बालगाव (ता. जत) येथे पार पडलेल्या योगशिबिरात एकाचवेळी १ लाख १0 हजार लोकांनी सूर्यनमस्कार घालून यापूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला.

सांगली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बालगाव (ता. जत) येथे पार पडलेल्या योगशिबिरात एकाचवेळी १ लाख १0 हजार लोकांनी सूर्यनमस्कार घालून यापूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला. सांगली जिल्हा प्रशासन व गुरुदेव आश्रमची नोंद यानिमित्ताने एशियन बुक ऑफ रेकॉर्डसह विश्वविक्रम नोंदविणाऱ्या तीन संस्थांकडे झाली आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्रही बालगाव येथे वितरीत करण्यात आले.जिल्हा प्रशासन आणि गुरुदेव आश्रम, बालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालगाव येथे योगशिबिर भरविण्यात आले होते. शिबिरासाठी ६0 बाय ४0 चे भव्य स्टेज उभारण्यात आले होते. उपस्थितांसाठी तिनशे बाय तिनशेचे ८ ब्लॉक करण्यात आले होते. महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, नागरिक, विद्यार्थी, महिला या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. सकाळी साडे नऊ वाजता सूर्यनमस्कारास सुरुवात झाली. ११ वाजता समारोप झाला. एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, मार्व्हल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा तीन संस्थांचे लोक हा विश्वविक्रम नोंदविण्यासाठी बालगाव येथे सकाळपासून दाखल झाले होते. कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर या विविध संस्थांच्या लोकांनी उपस्थितांची गणना करण्यास सुरुवात केली. १ लाख १0 हजार लोकांनी एकाचवेळी सूर्यनमस्कार घालून नवा विक्रम प्रस्थापित केला. विश्वविक्रमी उपक्रमासाठी गेल्या दहा दिवसांपासून जिल्हा प्रशासन, बालगावचे गुरुदेव आश्रम, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, विविध शाळा, संस्थाचालक तयारी करीत होते. जिल्हा प्रशासनाने इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या लोकांसाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था याठिकाणी केल्या होत्या. त्यामुळे अत्यंत शिस्तबद्धरित्या व शांततेत हा उपक्रम पार पडला. विश्वविक्रमाची नोंद झाल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रमही यावेळी पार पडला. शिबिरासाठी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री व पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आ. विलासराव जगताप, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, सिध्देश्वर महास्वामी, येथील आश्रमाचे प्रमुख अमृतानंद महास्वामी आदी उपस्थित होते. 

कोणाच्या नावावर आहेत विक्रमगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा विचार करता २0१७ मध्ये म्हैसूर येथील जिल्हा प्रशासनाने जागतिक योगदिनानिमित्त योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला होता. त्यात ५५ हजार ५0६ लोकांच्या सहभागाने विश्वविक्रम नोंदला गेला. एशियन बुक आॅफ रेकॉर्डमधील नोंदीनुसार पुणे येथे २0१६ मध्ये १ हजार ४४0 लोकांनी एकत्रीत सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम नोंदविला होता. सांगली जिल्ह्यातील बालगावमध्ये एकूण १ लाख १0 हजार लोकांनी सहभाग नोंदवित सूर्यनमस्काराचा उपक्रम साकारला. त्यामुळे यापूर्वीचे विक्रम सांगली जिल्ह्याने मोडित काढल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन संस्थांनी याची तात्काळ नोंद घेतली असून लिमका बुकसाठीही हा विक्रम नोंदला जाण्याची चिन्हे आहेत. 

नियोजनाला यश : विजयकुमार काळम-पाटील जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील म्हणाले की, उपक्रमाचे यश हे संपूर्ण टिमचे आहे. गुरुदेव आश्रम, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, शिक्षक, विद्यार्थी, पोलिस, स्वयंसेवक अशा सहभागी सर्व लोकांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे हा विश्वविक्रम साकारला आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. केवळ विश्वविक्रमच नव्हे तर या उपक्रमातून आरोग्याविषयी जागृतीचा मोठा संदेश पोहचविण्यातही आम्हाला यश मिळाले आहे.