शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादनामध्ये तीन लाख लिटरची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 13:19 IST

महापुरात पशुधनाची हानी झाल्याने जिल्ह्यात दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटले आहे. जिल्ह्यात सुमारे ४० हजार गाई, म्हैशी अशी पाळीव जनावरे असून, महापुरात जनावरांचा मृत्यू व चारा टंचाईमुळे दूध उत्पादन घटल्याची माहिती दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले यांनी दिली. दुधाच्या टंचाईमुळे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदूध उत्पादनामध्ये तीन लाख लिटरची घटसहा महिन्यात दूध उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता

सदानंद औंधेमिरज : महापुरात पशुधनाची हानी झाल्याने जिल्ह्यात दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटले आहे. जिल्ह्यात सुमारे ४० हजार गाई, म्हैशी अशी पाळीव जनावरे असून, महापुरात जनावरांचा मृत्यू व चारा टंचाईमुळे दूध उत्पादन घटल्याची माहिती दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले यांनी दिली. दुधाच्या टंचाईमुळे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे.जिल्ह्यात नदीकाठावर असलेल्या चार तालुक्यांना आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराचा फटका बसला. नदीकाठावरील चार तालुक्यांतच मोठ्या संख्येने दुभती जनावरे व दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. दररोज होणाऱ्या सुमारे १२ लाख लिटर दूध संकलनापैकी ४० टक्के गाईचे दूध आहे. जिल्ह्यात सरासरी १५ लाख लिटर दैनंदिन दूध संकलन होते. पावसाळ्यात दूध संकलनात वाढ होते; मात्र महापुरात पशुधनाची मोठ्याप्रमाणात हानी झाल्याने दूध उत्पादनास फटका बसला आहे. महापुरात हजारो जनावरांचा मृत्यू झाला.नदीकाठच्या गावात पुरामुळे व पूर नसलेल्या तालुक्यात चारा टंचाई असल्याने दूध उत्पादन घटल्याचे सांगण्यात आले. दुधाच्या टंचाईमुळे दूध पावडर उत्पादन केवळ ५ टक्क्यावर आले आहे. दुधाला मागणी असल्याने गाईच्या दुधाचा खरेदीदर १८ वरुन २९ रुपये, तर म्हैशीच्या दुधाचा ३८ वरून ४४ रुपयांवर पोहोचला आहे.मराठवाड्यातील अतिरिक्त दूध मिरजेच्या शासकीय दूध डेअरीत पावडर निर्मितीसाठी पाठविण्यात येत होते. मात्र दुधाच्या टंचाईमुळे मराठवाड्यातून येणारे दूध आता बंद झाल्याने शासकीय दूध डेअरीची खासगी संघांकडून होणारी पावडर निर्मिती बंद झाली आहे.आॅगस्टमध्ये आलेल्या जिल्ह्यातील महापुरानंतर १० लाखांवर आलेले दूध संकलन गेल्या पाच महिन्यात १२ लाखांवर आले असून, सरासरी दूध उत्पादनात अद्याप ३ लाखांची घट आहे. पुढील सहा महिन्यात दूध उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :milkदूधSangliसांगली