शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

नागजजवळ खासगी बस उलटून तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:01 IST

ढालगाव : मिरज-पंढरपूर महामार्गावर नागज (ता. कवठेमहांकाळ) फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर विठ्ठलवाडी पेट्रोलपंपाजवळ खासगी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात माय-लेकासह तिघेजण जागीच ठार झाले. हीना जमीर शेख (वय ३५, रा. सोलापूर) व सुभाजिन जमीर शेख (दीड वर्ष) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. अन्य एका मृताचे नाव समजू ...

ढालगाव : मिरज-पंढरपूर महामार्गावर नागज (ता. कवठेमहांकाळ) फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर विठ्ठलवाडी पेट्रोलपंपाजवळ खासगी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात माय-लेकासह तिघेजण जागीच ठार झाले. हीना जमीर शेख (वय ३५, रा. सोलापूर) व सुभाजिन जमीर शेख (दीड वर्ष) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. अन्य एका मृताचे नाव समजू शकले नाही. या अपघातात वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री साडेसात वाजता ही घटना घडली.दीपकराज कंपनीची खासगी बस (एमएच ०९ सीव्ही ७२७) नेहमीप्रमाणे कोल्हापूरहून सोलापूरला निघाली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास नागज फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर विठ्ठलवाडी गावाजवळ बसचा वेग न आवरल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्या पश्चिम बाजूला उलटली. अपघात इतका भीषण होता की, बसची पुढील चाके निखळून पडली. प्रवाशांमध्ये हाहाकार माजला. सर्वत्र आरडाओरड व प्रवाशांचे विव्हळणे सुरू झाले. अपघातात हीना जमीर शेख व सुभाजिन जमीर शेख या माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. आणखी एका मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. मृत व जखमींना तातडीने आपत्कालीन रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात, तसेच सांगोला येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी बसचालक सतीश मोतीराम चोरगे (३८, रा. मोहोळ, जि. सोलापूर), रजाक अमीन मोमीन (४६), नजमा रजाक सय्यद (४०), प्रवीण शिंदे (३५, रा. वाटंबरे), सनजीत देवरी (१९, रा. कागल) यांच्यावर मिरज शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींची नावे समजू शकली नाहीत.दीपकराज ट्रॅव्हल्स कंपनीची बस ही दररोज कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर प्रवास करते. सायंकाळी कोल्हापूरहून सोलापूरला निघते व दुसºया दिवशी सकाळी सोलापूरहून कोल्हापूरला जाते. एसटी महामंडळाप्रमाणे ही खासगी बस कोल्हापूर-सोलापूर महामार्गावरून प्रत्येक थांब्यावर वडापप्रमाणे वाहतूक करते. आजही नेहमीप्रमाणे ती कोल्हापूरपासून वडाप करीत आली होती. त्यामुळे या बसमध्ये कोणते प्रवासी कोठे बसले होते, याची माहिती कळू शकली नाही. बसमधून वडाप सुरू असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष कसे झाले? याची चौकशी करावी, अशी मागणी लोकांनी केली आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, उपनिरीक्षक सचिन वसमाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी पाठविले. नागजचे पोलीसपाटील दीपक शिंदे व तानाजी शिंदे यांनी जखमींना पाठविण्यासाठी मदत केली.