शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तीन ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला

By admin | Updated: July 23, 2016 00:05 IST

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा तर संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी, मांडवे खुर्द ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे़

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा तर संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी, मांडवे खुर्द ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे़ त्याचबरोबर जिल्ह्यातील १०१ ग्रामपंचायतींतील १५३ जागांसाठी पोट निवडणुका होत असून, येत्या २४ आॅगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे़ निवडणुका असलेल्या गावांत गुरुवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे़राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत़ त्यानुसार नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा, तर संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी व मांडवे खुर्द ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत़ तसेच जिल्ह्यातील १०१ ग्रामपंचायतीतील १५३ सदस्यांची पदे विविध कारणांमुळे रद्द झाली आहेत़ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत़ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास ३ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहेत़ अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १० आॅगस्ट आहे़ अर्ज माघारी घेण्यासाठी अंतिम मुदत १२ आॅगस्ट असून, मतदान २४ आॅगस्ट रोजी होणार असून, मतमोजणी २६ आॅगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे़ राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या पिंपळगाव पिसा गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे़ निवडणूक पुढील आॅगस्ट महिन्यात होणार असली तरी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरुवात होणार आहे़ त्यामुळे या गावातील राजकारणही चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत़ याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी व मांडवे खुर्दचीही निवडणूक होत असून, या निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगणार असल्याची चिन्हे आहेत़ पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्याही मोठी आहे़ एक व दोन जागांसाठीही का होईना, पण पोटनिवडणूक होणार आहे़ त्यामुळे पोट निवडणुका असलेल्या गावांत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे़ (प्रतिनिधी)