शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मोटारीची काच फोडून तीन लाख लंपास

By admin | Updated: October 2, 2016 01:12 IST

पेरणीचा वाद : चाकू, काठ्या, गजाने हल्ला

सांगली : येथील जुना बुधगाव रस्त्यावरील वखार भागामध्ये मोटारीची काच फोडून चोरट्यांनी आतील तीन लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कारंडेवाडी (ता. सांगोला) येथील रामा दरीबा नरळे (वय ४८) यांनी घटनेची शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शहरात तातडीने नाकाबंदी केली होती. रामा नरळे यांचा ट्रक वाहतुकीचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी स्वत:चा ट्रक (क्र. एमएच १० एक्यू ३६०७) रंगकामासाठी वखार भागातील गॅरेजमध्ये सोडला होता.या कामाची मजुरी तीन लाख रुपये झाली होती. ती देण्यासाठी ते शनिवारी मोटारीने (एमएच ४५ एन ५४०७) सांगलीत आले होते. आझाद चौकातील अ‍ॅक्सीस बँकेतून त्यांनी तीन लाखांची रोकड काढली. ही रोकड त्यांनी बॅगेत ठेवली. बॅग मोटारीत चालकाच्या बाजूच्या आसनावर ठेवून ते दुपारी एक वाजता वखार भागात गेले. तेथील भोजलिंग ट्रान्स्पोर्टजवळ त्यांनी मोटार लावली. ट्रकचे रंगकाम पाहण्यासाठी ते गॅरेजकडे चालत गेले. जाताना त्यांनी रोकड असलेली बॅग मोटारीतच ठेवली. रंगकाम करणाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. ट्रकचे संपूर्ण काम झाल्याने मजुरी देण्यासाठी रक्कम घ्यावी म्हणून ते पुन्हा मोटारीकडे आले. त्यावेळी त्यांना मोटारीची चालकाच्या बाजूची काच फोडल्याचे लक्षात आले. मोटारीत काचांचा खच पडला होता. रोकड असलेली बॅग नव्हती. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. गॅरेज व्यावसायिकांनी तेथे गर्दी केली. पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शहरात तातडीने नाकाबंदी करण्यात आली. कॉलेज कॉर्नर, कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौक, जुना बुधगाव रस्ता, माधवनगर, बायपास रस्ता, पुष्पराज चौक, टिळक चौक, राजवाडा चौक येथे नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली. हेल्मेट घालून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांची चौकशी करण्यात आली. सायंकाळपर्यंत नाकाबंदी सुरू होती, पण चोरट्यांचा सुगावा लागला नाही. रात्री उशिरा नरळे यांची फिर्याद घेऊन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी) पाळत ठेवून चोरी आझाद चौकातील अ‍ॅक्सीस बँकेतून रोकड काढून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना लुटल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. रामा नरळे बँकेत गेल्यापासून चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली असण्याची शक्यता आहे. त्यांनी रोकड काढल्याचे पाहिल्यानंतर चोरट्यांनी वखार भागापर्यंत पाठलाग केला. ते मोटारीत बॅग ठेवून गेल्याचे पाहून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांतच मोटारीची काच फोडून रोकड लंपास केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. बॅगेत रोकडशिवाय नरळे यांचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, बँक पासबुक व धनादेश पुस्तक होते.