शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

काय सांगता? विहिरीचा घेर केवळ तीन फूट!, सांगलीतील शिराळ्यात चर्चेचा विषय

By श्रीनिवास नागे | Updated: January 20, 2023 15:52 IST

विहिरीचे खोदकाम दोघेच मजूर करीत आहेत, हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली

शिराळा (जि. सांगली) : उपवळे कदमवाडी (ता. शिराळा) येथे तीन फूट घेराच्या विहिरीचे सुरू असलेले काम तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. विहिरीचे खोदकाम दोघेच मजूर करीत आहेत, हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.मारुती ऊर्फ भिकू सावंत यांच्या शेतात या विहिरीचे काम सुरू आहे. संपत जगन्नाथ चव्हाण (५३), बाळासाहेब जगन्नाथ भोसले (५५, दोघे रा. राजापूर ता. तासगाव) विहिरीचे काम करीत आहेत. तिचा घेर तीन फूट असून आठ फूट लांबीचा पाइप घालून ही विहीर खोदाई सुरू केली आहे. या पाइपमधून एकजण खाली उतरून ब्रेकरच्या साहाय्याने खोदाई करून निघालेली माती, दगड बादलीच्या साहाय्याने वर ओढून घेत आहे.जवळपास तीस फूट खोल ही विहीर गेली आहे. आत उतरल्यावर खोदाई करणाऱ्यास ऑक्सिजन मिळतो की नाही, हेही पाहिले जाते. या दोघांनी सांगली, सातारा जिल्ह्यात अशा ५०० विहिरी खोदल्या आहेत.पंचवीस वर्षांपूर्वी करगणी (आटपाडी) येथील व्यक्तीला अशी विहीर खोदताना पाहिले आणि स्वतःच्या शेतात त्यांनी ही पहिली विहीर खोदली. त्यावेळी ब्रेकर नव्हता. आठ दिवसात ३५ फूट खोल विहीर काढली. आतापर्यंत सर्वात जास्त ८० फूट खोलीची विहीर २५ दिवसात खोदली आहे. बोरगाव (रहिमतपूर) येथे ३५ फूट खोल, वर तीन फूट व खाली २५ फूट घेरा असणारी विहीर खोदली आहे.

पूर्वी खोदाईसाठी ब्रेकर नव्हते. त्यावेळी कुदळीच्या साहाय्याने खोदाई केली जात होती. वेळ जास्त लागत होता. तीन फूट घेर व खाली चौदा पंधरा फूट गेल्यावर २५ फूट घेराच्या विहिरीची खोदाई कौशल्यपूर्ण ठरते. - संपत चव्हाण, बाळासाहेब भोसले, खोदाई कामगार

टॅग्स :Sangliसांगली