शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएसके’सह तिघांना अटक; दोन दिवस पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 18:43 IST

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके, वय ७१), त्यांची पत्नी हेमंती (६१) व मुलगा शिशिर (३४) या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने कारागृहातून अटक केली.

सांगली : सांगली जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके, वय ७१), त्यांची पत्नी हेमंती (६१) व मुलगा शिशिर (३४) या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने कारागृहातून अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. डीएसके ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेल्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक कुलकर्णी यांना २०१८मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या दीपक कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिशिर हे तिघेही येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. सांगली जिल्ह्यातील अनेकांनीही त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. त्यापैकी साठहून अधिक गुंतवणूकदारांनी, आपली फसवणूक झाल्याची तक्रार सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे. फसवणुकीची रक्कम जवळपास साडेचार कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने येरवडा कारागृहातून डीएसके त्यांची पत्नी व मुलाला अटक केली. रात्री उशिरा त्यांना सांगलीत आणण्यात आले. मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी डीएसके यांच्यावतीने अ‍ॅड. धीरज घाडगे यांनी युक्तिवाद केला. डीएसके यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार नाही, असे कधीही म्हटले नाही. त्यांनी पै न् पै परत करण्याची सातत्याने ग्वाही दिली आहे. ईडी, पुणे आर्थिक गुन्हे शाखांसह दिल्लीच्या तपास यंत्रणेनेही या प्रकरणाची चौकशी करून चार्जशीट दाखल केल्याचे सांगत, कोठडी न देण्याची विनंती केली, तर पोलिसांनी पाच दिवस कोठडीची मागणी न्यायालयात केली. एकोणीस मुद्द्यांवर तपास करण्याची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने डीएसके यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.