शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ३६३ गावांत जाहीर झाला दुष्काळ

By admin | Updated: May 13, 2016 00:16 IST

‘दुष्काळसदृश’ शब्द वगळण्याचे ‘शुध्दीपत्रक’ : न्यायालयाच्या निर्णयानंतर बदल

सांगली : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, शासनाने जाहीर केलेल्या ‘दुष्काळसदृश’ गावांमध्ये आता शासनाच्या नव्या शुध्दीपत्रकामुळे ‘दुष्काळ’ जाहीर झाला आहे. न्यायालयाच्या चपराकीनंतर शासनाने बुधवारी रात्री हे शुध्दीपत्रक जारी करत दुष्काळ जाहीर केला. राज्यातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. २०१४-१५ मध्ये खरीप हंगामात ज्या गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे, अशा गावांचा यात समावेश आहे. यात जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ३६३ गावांचा समावेश असून या गावांना अगोदरपासून दुष्काळासाठी लागू असलेल्या सवलती मिळत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्याच्या पूर्व भागातील टंचाईचा सामना करणाऱ्या आणि ज्या गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे, अशा गावांची यादी जिल्हा प्रशासनाने २० आॅक्टोबर २०१५ ला शासनाला सादर केली होती. बुधवारी सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या गावांची तालुकानिहाय नावे पुढीलप्रमाणे - मिरज : टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी, आरग, बेडग, लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, संतोषवाडी, जानराववाडी, मालगाव, खंडेराजुरी, गुंडेवाडी, पायाप्पाचीवाडी, सलगरे, चाबुकस्वारवाडी, बेळंकी, कदमवाडी, शिपूर, डोंगरवाडी, एरंडोली, व्यंकोचीवाडी, बुधगाव, बिसूर, कावजी खोतवाडी, वाजेगाव, कानडवाडी, मानमोडी, कवलापूर, रसूलवाडी, कांचनपूर, सांबरवाडी, काकडवाडी, तानंग, कळंबी, सिध्देवाडी, सोनी, करोली एम., भोसे, पाटगाव.तासगाव : तासगाव, वासुंबे, कवठेएकंद, चिंचणी, भैरववाडी, नागाव (क), मतकुणकी, बेंद्री, शिरगाव (क), कुमठे, येळावी, जुळेवाडी, तुरची, राजापूर, निमणी, नागाव (नि.), नेहरुनगर, ढवळी, वंजारवाडी, विसापूर, बोरगाव, आळते, निंबळक, चिखलगोठण, शिरगाव (वि.), लिंब, पानमळेवाडी, हातनूर, गोटेवाडी, पाडळी, खा. धामणी, हातनोली, मांजर्डे, आरवडे, तासगाव (पुणदी), बलगवडे, गौरगाव, पेड, मोराळे (पेड), धोडेंवाडी, विजयनगर, नरसेवाडी, कचरेवाडी, किंदरवाडी, सावळज, सिध्देवाडी, डोंगरसोनी, अंजनी, वडगाव, नागेवाडी, लोकरवाडी, जरंडी, दहीवाडी, वायफळे, यमगरवाडी, बिरणवाडी, बस्तवडे, मणेराजुरी, योगेवाडी, उपळावी, धुळगाव, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, कौलगे, लोंढे, खुजगाव, वाघापूर, डोर्ली.कवठेमहांकाळ तालुका : कवठेमहांकाळ, जाधववाडी, झुरेवाडी, लांडगेवाडी, शिरढोण, जायगव्हाण, अलकुड (एस), नागोळे, रांजणी, लोणारवाडी, कोकळे, करलहट्टी, बसाप्पाचीवाडी, कुची, जाखापूर, तिसंगी, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, घाटनांद्रे, रायवाडी, नागज, आरेवाडी, केरेवाडी, आगळगाव, शेळकेवाडी, देशिंग, मोरगाव, हरोली, बनेवाडी, खरशिंग, बोरगाव, अलकुड (एम), मळणगाव, हिंगणगाव, शिंदेवाडी (एच), विठुरायाचीवाडी, थबडेवाडी, अग्रण धुळगाव, पिंपळवाडी, करोली (टी), म्हैसाळ (एम), रामपूरवाडी, कोंगनोळी, कुकटोळी, सराटी, ढालगाव, कदमवाडी, घोरपडी, श्ािंदेवाडी (घो.), निमज, दुधेभावी, ढोलेवाडी, चोरोची, चुडेखिंडी, जांभुळवाडी, इरळी, मोघमवाडी, लंगरपेठ, ढालेवाडी.जत : साळमळगेवाडी, सिंदूर, बसर्गी, येळदरी, खिलारवाडी, वज्रवाड, गुगवाड, रामपूर, मल्याळ, मोकाशेवाडी, वायफळ, बनाळी, अंत्राळ, येळवी, खैराव, टोणेवाडी, आवंढी, सिंगणहळ्ळी, लोहगाव, धावडवाडी, प्रतापूर, गुळवंची, हिवरे, तिप्पेहळी, कोसारी, बिरनाळ, वाळेखिंडी, नवाळवाडी, डफळापूर, मिरवाड, जिरग्याळ, शेळकेवाडी, एकुंडी, कंठी, वाषाण, बागेवाडी, बेळुंखी, बाज, अंकले, डोर्ली, खलाटी, शिंगणापूर, तिल्याळ, सालेकीरी, माडग्याळ, सोन्याळ, लकडेवाडी, जा. बोबलाद, सनमडी, कोळगिरी, भिवर्गी, पांडोझरी, करेवाडी (को).खानापूर (विटा) : विटा, माहुली, नागेवाडी, चिखलहोळ, वलखड, हिंगणगादे, गार्डी, घानवड, पारे, कुर्ली, घाडगेवाडी, बामणी, मंगरुळ, चिंचणी मं., कार्वे, भाळवणी, पंचलिंगनगर, आळसंद, वाझर, कमळापूर, बलवडी -भा , तांदळगाव, जाधवनगर, ढवळेश्वर, कळंबी, खंबाळे - भा, लेंगरे, भूड, मादळमुठी, देविखिंडी, वाळूज, वेजेगाव, साळशिंगे, भेंडवडे, भाग्यनगर, देवनगर, सांगोले, जोंधळखिंडी, भिकवडी - बु, खानापूर, रामनगर, ऐनवाडी, जखिणवाडी, पोसेवाडी, जाधववाडी, गोरेवाडी, घोटी खुर्द, घोटी बु., रेवणगाव, धोंडगेवाडी, रेणावी, वासुंबे, भांबर्डे, करंजे, मोही, पळशी, बेणापूर, ताडाचीवाडी, हिवरे, कुसबावडे, धोंडेवाडी, भडकेवाडी, शेंडगेवाडी, बलवडी (खा), मेंगाणवाडी, बाणूरगड, सुलतानगादे.आटपाडी : खरसुंडी, चिंचाळे, वलवण, घाणंद, जांभुळणी, कामथ, मुढेवाडी, काळेवाडी, हिवतड, माळेवाडी, तळेवाडी, बाळेवाडी, नेलकरंजी, धावडवाडी, मानेवाडी, कानकात्रेवाडी, औटेवाडी, घरनिकी, पिंपरी - बु., पडळकरवाडी, झरे, विभुतवाडी, पारेकरवाडी, कुरुंदवाडी, गुळेवाडी, मिटकी.कडेगाव : कडेगाव, अपशिंगे, खंबाळे - औंध, नेर्ली, कोतवडे, तडसर, कडेपूर, शिवाजीनगर, निमसोड, अमरापूर, चिखली, शाळगाव, करांडेवाडी, बोंबाळेवाडी, वांग रेठरे, हिंगणगाव बु., रायगाव, उपाळे वांगी, उपाळे मायणी, येडे, तोंडोली, सासपडे, सोहोली, बेलवडे, विहापूर, रेणुशेवाडी, नेवरी, आंबेगाव, येतगाव, कान्हरवाडी, तुपेवाडी (ये.), खेराडे (वांंगी), कोतीज, ढाणेवाडी, खेराडे विटा, भिकवडी खु, तुपेवाडी (खे.), हणमंतवडिये, येवलेवाडी.वाळवा : वाघवाडी, शिवपुरी, जांभुळवाडी, पेठ, सुरुल, ओझर्डे, मरळनाथपूर, गाताडवाडी. (प्रतिनिधी)कमी आणेवारी असलेल्या गावांचाही समावेश?२०१४-१५ यावर्षी कमी आणेवारी असलेल्या खरीप हंगामातील या गावांबरोबरच रब्बी हंगामातीलही ५० पैशापेक्षा कमी असलेल्या गावांना दुष्काळाचा लाभ मिळणार आहे. शासनपातळीवरुन प्रथमच दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने ग्रामस्थांना अधिक सोयी मिळण्याच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. दरम्यान, या गावांमध्ये शिराळा तालुक्यातील गावांचा समावेश नसल्याने त्या गावांबाबत काय निर्णय होणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.