शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

सीलबंद गोदामातून सव्वातीन कोटींची साखर चोरीस

By admin | Updated: July 28, 2016 00:51 IST

पोलिसांत तक्रार : केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने केला पंचनामा

सांगली : थकीत अबकारी करापोटी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने सील केलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातून तीन कोटी ३0 लाखांची साखर चोरीस गेली आहे. याप्रकरणी विभागाच्या अधीक्षक उषा मौंदेकर यांनी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, चीफ केमिस्ट आणि गोदामकीपर यांच्याविरुद्ध संजयनगर पोलिसांत रीतसर तक्रार दिली आहे. अबकारी कराची थकबाकी वसूल न झाल्याने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने सप्टेंबर २0१५ मध्ये वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची दोन गोदामे सील केली आहेत. नोव्हेंबर २0१५ पासूनच्या अबकारी कराच्या थकबाकीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. जुन्या थकबाकीपोटीही साखर जप्त करण्यात आली होती. त्याचे पैसे भरल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. अशा परिस्थितीत बुधवारी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोदामांची पाहणी केल्यानंतर, त्यांना या ठिकाणाहून ३२ हजार ९४0 पोती साखर गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालक कमलाकर गुटे-पाटील, चीफ केमिस्ट व्ही. डी. चव्हाण आणि गोदाम किपर एस. डी. पाटील यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या या तक्रारीने कारखाना तसेच जिल्हाभर खळबळ माजली आहे. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी गोदामांची पाहणी करून तक्रार दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सुहास बावचे व पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी गोदामांची पाहणी करून पंचनामा केला व रीतसर तक्रार नोंदवून घेतली आहे. अबकारी कराच्या थकबाकीप्रकरणी गोदाम सील करण्याची कारवाई केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने केली होती. सेसमध्ये वाढ झाल्याने थकबाकीची रक्कम आता मोठी दिसत आहे. डिसेंबर २0१५ मधील साखर विक्रीवरील कराची ही रक्कम थकीत असल्याबद्दल केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने नोटीस बजावली होती. त्यानंतरही कराचा भरणा झाला नसल्याने कारखान्याच्या मागील बाजूस असलेली दोन मोठी गोदामे सील करण्यात आली आहेत. त्याठिकाणची साखरही जप्त करण्यात आली होती. (प्रतिनिधी)चोरी नव्हे, साखरेचे स्थलांतरवसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले की, कारखान्यातील या साखरेच्या सुरक्षेची जबाबदारी ही कारखान्यावरच सोपविली जाते. मध्यंतरी अतिवृष्टीमुळे कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून ते गोदामात शिरले होते. पाण्यात भिजून साखर खराब होऊ नये म्हणून आम्ही ती दुसऱ्या गोदामात स्थलांतरित केली आहे. साखर खराब झाली असती, तरीही त्याचा दोष आमच्यावरच आला असता. ज्या साखर पोत्यांबद्दल केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने तक्रार केली आहे, त्याची संपूर्ण रक्कम दंड, व्याजासहित आम्ही भरलेली आहे. याशिवाय जप्त केलेली साखर कारखान्यातून बाहेर गेलेली नाही. त्यामुळे हा चोरीचा प्रकार नाही. चौकशीत योग्य त्या गोष्टी समोर येतील, असे पाटील म्हणाले. जिल्हा बॅँकही तपासणी करणारजिल्हा बॅँकेकडून वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास १५ कोटी रुपयांचे माल ताबेगहाण कर्ज दिले आहे. त्यामुळे एका गोदामातील ६० हजार ७९० पोती साखर जिल्हा बॅँकेच्या ताब्यात आहे. ही साखर सुरक्षित आहे की नाही, याबाबतची तपासणी जिल्हा बॅँकेचे अधिकारी आज, गुरुवारी करणार आहेत. ही साखर सुरक्षित असणार, असा विश्वास बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.