शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत वाहतूक कोंडीने तिसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:07 IST

मिरज बसस्थानकाजवळ हातगाड्या व विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे वारंवार वाहतूक कोंडीमुळे रविवारी दुपारी आणखी एका अपघातात पुणे-कवठेमहांकाळ एसटीच्या चाकाखाली सापडून रुकमुद्दीन हुसेनसाब मोकाशी (वय ४६, रा. विजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देमिरजेत वाहतूक कोंडीने तिसरा बळीदुरूस्तीबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारंवार अपघातांचे प्रकार

मिरज : मिरज बसस्थानकाजवळ हातगाड्या व विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे वारंवार वाहतूक कोंडीमुळे रविवारी दुपारी आणखी एका अपघातात पुणे-कवठेमहांकाळ एसटीच्या चाकाखाली सापडून रुकमुद्दीन हुसेनसाब मोकाशी (वय ४६, रा. विजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.

बसस्थानक व स्टेशन चौक परिसरात वाहतूक कोंडीमुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. स्टेशन चौकात दोनच महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा येथे अपघातांची मालिका सुरुच असल्याचे चित्र आहे.मिरजेत गांधी चौक ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दोन महिन्यांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा बळी गेला आहे. मात्र स्टेशन चौकात ड्रेनेज यंत्रणा खचल्याने लावलेले बॅरिकेट्स अद्यापही हटविण्यात आले नसल्याने चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. रविवारी याच रस्त्यावर रुकमुद्दीन मोकाशी यांचा बळी गेला. ते एसटी बसच्या चाकाखाली सापडले.मिरजेत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने नागरिक हैराण आहेत. मोठी वर्दळ असलेल्या बसस्थानक चौकात तीन महिन्यांपूर्वी ड्रेनेज यंत्रणा खचून खड्डा पडल्याने महापालिकेने बॅरिकेट्स लावले आहेत.

चौकात लावलेल्या बॅरिकेट्सला धडकून व वाहतूक कोंडीत ट्रकखाली सापडून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्यानंतर येथे लावलेले बॅरिकेट्स हटविण्यात आले. मात्र चौकामध्ये खचलेल्या ड्रेनेज यंत्रणेची दुरूस्ती न झाल्याने खड्ड्याभोवती लावलेले बॅरिकेट्स अद्याप तसेच आहेत.

राष्ट्रीय महामार्गात समावेश असलेल्या गांधी चौक ते बसस्थानक या प्रमुख रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बसस्थानक चौकात रस्त्यावरील विक्रेते, हातगाड्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होते. राष्ट्रीय महामार्गात समावेश झालेल्या शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्क करण्यात येत आहे.

नादुरूस्त ड्रेनेज यंत्रणेमुळे गेले सहा महिने रस्त्याच्या मधोमध लावलेल्या बॅरिकेट्सचा स्टेशन चौकात वाहतुकीला अडथळा आहे. रात्रीच्या अंधारात बॅरिकेट्स न दिसल्याने अपघात होत आहेत.रस्ता व ड्रेनेज यंत्रणेच्या दुरूस्तीबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारंवार अपघातांचे प्रकार सुरू असल्याने नागरिक संतप्त आहेत. प्रमुख चौकात वारंवार खचणाऱ्या जीर्ण ड्रेनेज यंत्रणेची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली