शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विचारवंत म्हणाले, साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:21 IST

सांगली : समाजातील दु:खी, पीडितांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांच्या दु:खात मनोरंजन शोधणाऱ्या प्रवृत्तींचा अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभाग असतो. नयनतारा ...

सांगली : समाजातील दु:खी, पीडितांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांच्या दु:खात मनोरंजन शोधणाऱ्या प्रवृत्तींचा अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभाग असतो. नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटनापासून दूर ठेवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाºयांचा केवळ निषेध न करता, कष्टकºयांच्या करातून जमा झालेला पैसा साहित्य संमेलनाला देऊ नये, अशी ठाम भूमिका मान्यवरांनी रविवारी व्यक्त केली.अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रित करून, नंतर निमंत्रण मागे घेण्याच्या निर्णयाच्या निषेधासाठी रविवारी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत बैठक घेतली. यावेळी सहगल यांच्या संमेलनात होणाºया भाषणाचे सामूहिक वाचन करण्यात आले.ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावून नंतर निमंत्रण रद्द करण्याच्या साहित्य संमेलन आयोजकांच्या निर्णयाने सर्वजण अस्वस्थ आहेत. कलावंत, लेखक, विचारवंतांचे वर्तन हे समाजासाठी प्रेरणा देणारे असावे. त्यांच्या साहित्यातून मानवतेची मूल्ये मांडली गेली पाहिजेत. मात्र, असे होताना दिसत नाही. त्यामुळे दृष्टी व्यापक करत विद्रोही साहित्याचे प्रमाण वाढले पाहिजे. खरा स्वातंत्र्यलढा उभारण्याची आता वेळ आली आहे. महामंडळाने शब्दवेल्हाळ गुलामांची फौज तयार केली आहे.धनाजी गुरव म्हणाले, सहगल यांचे विचार पुरोगामी आहेत हे माहीत असतानाही, त्यांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलाविण्यात आले. समाजवादी व स्वत:ला क्रांतिकारी विचारांचे समजणारे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वळचणीला गेले आहेत. यातील अनेक लेखक स्वत:ला पुरोगामी म्हणवत असले तरी, त्यांच्या विचारातून ते दिसत नाही. या निर्णयाचा निषेध करायला हवा.अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले, पुरस्कारांसाठी लिहिणाºया संमेलनाशी बांधील रहावे लागते. आता सावधपणे भूमिका आवश्यक आहे. सहगल यांचे निमंत्रण रद्दचे कृत्य हे अनवधानाने नव्हे, तर ठरवून झालेले कृत्य आहे. केवळ निषेध न करता साहित्य संमेलनासाठी देण्यात येणारे अनुदान बंद करण्यासाठी पाठपुरावा करावा.यावेळी नामदेव करगणे, वि. द. बर्वे, गौतमीपुत्र कांबळे, विकास मगदूम, बी. जी. पाटील, योगेश पाटील, सदाशिव मगदूम, शाहिन शेख, विद्या स्वामी, दिग्विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.बुधवारी सांगलीत पुस्तिकेचे प्रकाशनजिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनांच्या पुढाकाराने बुधवार, दि. २३ रोजी स्टेशन चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी नयनतारा सहगल यांचे साहित्य संमेलनातील भाषण व इतर क्रांतिकारी विचारांची मांडणी असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्याचा निर्णय घेण्यात आला.