शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

हेल्पिंग हॅन्डस् भागवतेय दुष्काळग्रस्तांची तहान

By admin | Updated: May 13, 2016 00:15 IST

तासगावात खारीचा वाटा : स्वखर्चातून रोज दोन टँकर पाणी देण्याचा उपक्रम

दत्ता पाटील -- तासगाव -सततच्या दुष्काळामुळे तासगाव तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र दुष्काळग्रस्तांची तहान भागवण्यासाठी तासगावातील हेल्पिंग हॅन्डस् या संस्थेच्या माध्यमातून तरुणाईने पुढाकार घेतला आहे. स्वखर्चातून रोज दोन टँकर पाणी टंचाईग्रस्त गावांना उपलब्ध करून देत, त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. तासगाव तालुक्यातील बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याची भीषण अवस्था झाली आहे. लोकांना वणवण करावी लागत आहे. पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यामुळे अनेक गावांत पाणी योजना कुचकामी ठरत आहेत. काही ठिकाणी प्रादेशिक योजनांची अवस्था बिकट आहे. दुष्काळी गावांची होणारी फरफट पाहून तासगाव शहरातील काही तरुणांनी खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला. हेल्पिंग हॅन्डस् या संस्थेच्या माध्यमातून या तरुणाईने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रोज दोन टँकर पाणी दुष्काळी गावांना देण्याचा संकल्प केला. एक तारखेपासून त्यांचा हा संकल्प अंमलात आला. लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईपर्यंत टँकर सुरु ठेवण्याचा मानस या तरुणांचा आहे. प्रशासनाकडून टँकरने होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. मात्र हेल्पिंग हॅन्डस्कडून टँकरने पाणी मिळाल्यानंतर गौरगाव, धामणी, पाडळी, बस्तवडे या गावांतील लोकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या गावांतील लोकांची मिळालेली कौतुकाची थाप, या तरुणांना प्रोत्साहन देणारी ठरली. प्रतिसाद पाहून संघटनेत सहभागी होण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. अशी झाली ‘हेल्पिंग हॅन्डस्’ची सुरुवात तासगाव शहरात ३० ते ४० उच्चशिक्षित, समवयस्क तरुणांचा ग्रुप आहे. हे तरुण सतत एकत्रित येतात. एकत्रित येण्याचा फायदा समाजाला करुन देण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार समाजातील अडचणीच्या प्रसंगात, सामाजिक कार्यात योगदान देण्याचा संकल्प त्यांनी केला. त्यासाठी स्वकमाईतील काही पैसे खर्च करण्याचे ठरले. हेल्पिंग हॅन्डस् नावाची संस्था स्थापन केली. वर्षभरात या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. एक मेपासून स्वखर्चातून रोज दोन टँकर पाणीपुरवठा करण्याचा संकल्प करण्यात आला आणि जनतेला हेल्पिंग हॅन्डस्चा मदतीचा हात मिळाला. संस्थेच्या या कामाची दखल घेऊन पुण्यातील द पुना मर्चंटस् चेंबरने हेल्पिंग हॅन्डस्मार्फत पंचवीस टँकरची जबाबदारी उचलली आहे.