शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर काही चालू देणार नाही

By admin | Updated: May 24, 2016 00:55 IST

कृष्णकांत उपाध्याय : तक्रार येताच चौकशी करून कारवाई करण्यास प्राधान्य

कृष्णकांत उपाध्याय... सांगलीचे नवे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख... पहिल्यांदाच सांगलीकरांना या पदावर आयपीएस अधिकारी मिळाला आहे. ‘डॅशिंग’ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी प्रशिक्षणाचा त्यांचा सहा महिन्यांचा कालावधी सांगली जिल्ह्यात पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. त्यांना पदभार स्वीकारुन पंधरा दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा त्यांनी लावला आहे. गुन्हेगारांवर कारवाई, वाहतूक नियोजन, रात्रीची दंगामस्ती, गुन्हेगारी रोखणे, यासाठी विशेष मोहीम आखण्याचे त्यांचे नियोजन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : वाराणसी ते सांगली हा तुमचा प्रवास कसा झाला? मराठी भाषेची अडचण आली का?उत्तर : उत्तर प्रदेशमधील वाराणसी माझे गाव. बी. टेक्. शिक्षण होताच युपीएससीतून आयपीएसपदी निवड झाली. यातून माझी महाराष्ट्रात नियुक्ती झाली. आता मी महाराष्ट्रीयन आहे. मराठी भाषा मला येईल का नाही, अशी भीती होती. पण पोलिस दलात सेवा सुरू केल्यानंतर ही भाषा हळूहळू अवगत झाली. अक्कलकोटमध्ये असताना लोकांच्या माध्यमातून ही भाषा शिकलो. आता मी मराठीतूनच संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ही भाषा खूप चांगली व सहजपणे शिकता येते. प्रश्न : अक्कलकोटमधील कामाचा अनुभव कसा राहिला? किती दिवस सेवा झाली?उत्तर : अक्कलकोटमध्ये काम करताना खूप चांगला अनुभव आला. बरेच काही शिकता आले. तेथील जिल्हा पोलिस प्रमुखांनीही सहकार्य केले. लोक कार्यालयात येऊन बेकायदेशीर धंद्यांची माहिती द्यायचे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाई करता आली. त्याठिकाणी दीड वर्ष सेवा झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. लोकांना कायदा हातात घेऊ दिला नाही. लोकांच्या तक्रारी येताच कारवाई केली. त्यानंतर पुन्हा सांगलीला बदली झाली. प्रश्न : सांगलीत यापूर्वी तुम्ही काम केले आहे. त्यावेळी पोलिसांसमोर तुम्हाला कोणती आव्हाने दिसून आली?उत्तर : होय, दोन वर्षांपूर्वी मी सांगलीत काम केले आहे. २०१२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगातून आयपीएसपदी निवड झाली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक या पदाचा प्रशिक्षण कालावधी सांगलीत पूर्ण केला. त्यामुळे जिल्ह्याची माहिती आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. वाहनांची संख्याही अत्यंत कमी आहे. स्मार्ट फोन, लॅपटॉप हे नियंत्रण कक्षात आहे. पण हीच सुविधा पोलिस ठाणे स्तरावर उपलब्ध करुन दिली, तर त्याचा फार चांगला परिणाम दिसून येईल. पोलिस दल सर्व सोयींनी सुसज्ज पाहिजे. सोयी-सुविधा नसल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामावर दिसून येतो.प्रश्न : अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून काम करताना कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे?उत्तर : कोणतीही तक्रार आली, तर त्याची चौकशी करुन तातडीने कारवाई करण्यास प्राधान्य दिले जाईल. तक्रारी वैयक्तिक किंवा दोन गटातील असतात. अवैध धंद्यांविरुद्धही तक्रार असू शकते. पोलिस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली जात नसेल, तर नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. अवैध धंद्यांसह बेकायदेशीर काही सुरु असेल तर त्याचीही माहिती द्यावी. ही माहिती समक्ष द्यावी किंवा लेखी पत्र पाठवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. बेकायदेशीर काहीच चालू देणार नाही. कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. पोलिस ठाणे स्तरावरही कारवाई सुरु असल्याचे दिसून येते. अवैध धंद्यांवर कारवाई करणे, हा कामाचा दोन टक्के भाग आहे. याशिवाय गुन्ह्यांचा तपास, आरोपींना शिक्षा लावणे, हे प्रमुख काम आहे. त्यास प्राधान्य दिले जाईल. प्रश्न : गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती पावले उचलणार आहात?उत्तर : गुन्हेगारीचा आलेख हा नेहमीच चढ-उताराचा असतो. सांगलीच्या गुन्हेगारीचा यापूर्वीच अभ्यास झाला आहे. ही गुन्हेगारी रोखण्याचे विशेष नियोजन केले आहे. यामध्ये ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ ही मोहीम दररोज दोन तास राबविली जाईल. नाकाबंदी सातत्याने लावली जाईल. रात्री उशिरापर्यंत सुरु राहणारी हॉटेल्स, ढाबे, परमिट रुम, पानटपऱ्या बंद केल्या जातील. रात्री अकरानंतर शहर शांत झाले पाहिजे. सामान्य माणसाला सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे, असे काम केले जाईल. रात्री अकरानंतर सर्व व्यवहार बंद झाले पाहिजेत, असा आदेश काढणार आहे. या आदेशाचे पालन केले आहे का नाही, हे पाहण्यासाठी मी स्वत: रस्त्यावर उतरणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली जाईल. पुढील आठवड्यात जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची गुन्हेगारी आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत दैनंदिन कामाबाबत मार्गदर्शन व सूचना केल्या जातील. - सचिन लाड, सांगली