शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला कोणताही धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:25 IST

सांगली : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेली स्फोटके व त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने ...

सांगली : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेली स्फोटके व त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. यातून कोणीही सुटू नये यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांचे पत्र म्हणजे कोणाची तरी सहानुभूती मिळवून या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचाच प्रकार आहे, असा आरोप जलसंपदामंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केला.

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणावरून सरकारला कोणताही धोका नसून सरकार पूर्ण स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. सांगली पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, हिरेन हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने चालू आहे. या प्रकरणात कितीही मोठ्या अधिकाऱ्याचा सहभाग असो त्याच्यावर कारवाईची ठाम भूमिका घेतली आहे. एनआयएला तपासात सहकार्य आणि एटीएसचा तपास अधिक गतीने करून या प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी सरकार गंभीर आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी कोणी ठेवली, स्फोटके नागपूरहून आली की कोठून आली आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू कसा झाला, याचे सत्य समोर आलेच पाहिजे. मात्र, कोणाची तरी सहानुभूती मिळविण्यासाठी व या प्रकरणावरून, त्याच्या तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी आता असे पत्र समोर येत आहे. या प्रकरणात ज्या ज्या अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे, ते सुटू नयेत हीच राज्य सरकारची सुरुवातीपासूनची भूमिका आहे.

चौकट

पूर्णपणे स्थिर

सरकारने सुरुवातीपासूनच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून सरकारला कोणताही धोका नाही, असेही पाटील यांनी सांगितले.