शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पोटाला पैसा न्हाई, चांगलं अन्नच द्यावं लागीतं - राहीबाई पोपेरे 

By अविनाश कोळी | Updated: September 4, 2023 20:14 IST

पोपेरे म्हणाल्या की, लग्नानंतर २५ वर्षे गायीच्या गोठ्यात आन् रानात आयुष्य गेलं. गोठ्यातच चार बाळंतपणं झाली.

सांगली: ‘देशी बिया, देशी गाय आपण इसरलो...हायब्रीड अन् केमिकलच्या नादी लागून आजारपण घरात आणलं. शेतातून चांगलं अन्न पिकवायचं सोडून पैसा पिकविण्यामागं सारे लागलेत. पोटाला पैसा न्हाई, चांगलं अन्नच द्यावं लागतं. तरच शरीर चांगलं राहील’, असे मत बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यसैनिक अॅड. जे. जी पाटील यांच्या २१व्या स्मृतिदिनानिमित्त सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात सोमवारी पोपेरे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सेवानिवृत्त कृषी सचिव नानासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.

पोपेरे म्हणाल्या की, लग्नानंतर २५ वर्षे गायीच्या गोठ्यात आन् रानात आयुष्य गेलं. गोठ्यातच चार बाळंतपणं झाली. कधी आजार म्हाईत नव्हता. घरात आजारपण वाढलं तसंच माझ्या मनात पाल चुकचुकली. शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली बसून इचार केला अन् कळालं मातीला आजारी पाडल्यानं घरात आजारपण येतंय. तवाच ठरवलं आता रानात केमिकल अन् हायब्रीड बिया टाकायच्या न्हाईत. घरातनंच मला विरोध झाला, पण मी थांबले न्हाई. बचत गटातल्या महिलांना देशी बियांचं वाण दिलं. देशी वाणाचं महत्त्व गावाला सांगितलं. हळूहळू साऱ्यांना ते पटलं. आता दीडशे गावात देशी वाणाची केमिकल नसलेली शेती लोकं करतात. साडेतीन हजार महिला यासाठी काम करतात. पण सगळीकडंच असं चित्र दिसायला हवं. यावेळी अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, इसरेडचे संस्थापक किरण कुलकर्णी, जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन उपस्थित होते. एच. वाय. पाटील यांनी स्वागत केले.

ऊस पोटाला खाताय का?सांगली, कोल्हापूर, साताऱ्याकडं आलं की सगळीकडं उसाची रानं दिसतात. त्यातनं पैसा भरपूर मिळतो. पण आपली भरडधान्यं लोकं इसरल्यात. पोटाला खायचं असेल तर ऊस चालतो का? की पोटात पैसा घालीता? असे सवाल पोपेरे यांनी उपस्थित केले.चौकट

अनुभवातल्या तत्त्वज्ञानाने सारे भारावले‘ज्याच्यात चमक हाय, त्यात धमक न्हाय’, ‘मरून जायचं, पण सरून जायचं न्हाई’, ‘माती चांगली, तर आरोग्य चांगलं’ अशा प्रकारच्या अनुभवातल्या तत्त्वज्ञानातून पोपेरे यांनी दिलेले संदेश ऐकून उपस्थित भारावले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. 

टॅग्स :sangli-acसांगली