शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वरिष्ठ डॉक्टर नसतात रुग्णालयात, रुग्णांचा जीव ‘शिकाऊं’च्या हातात 

By संतोष भिसे | Updated: October 12, 2023 15:58 IST

अधिष्ठात्यांच्या पाहणीत धक्कादायक निरीक्षणे, विभाग प्रमुखांनी वेळापत्रक देण्याची सूचना

संतोष भिसे

सांगली : वरिष्ठ जबाबदार डॉक्टर गायब आणि रुग्णांचा जीव शिकाऊ कनिष्ठ डॉक्टरांच्या हातात, असा धक्कादायक प्रकार सांगली, मिरज व तासगाव शासकीय रुग्णालयांत आढळला आहे. खुद्द अधिष्ठात्यांच्या पाहणीमध्येच हा सावळागोंधळ आढळला असून, यासंदर्भात त्यांनी डॉक्टरांना खरमरीत पत्र काढले आहे.नांदेड, नागपूर, ठाणे रुग्णालयांतील मृत्यूसत्रानंतर अन्य शासकीय रुग्णालयांच्याही कामकाजाचा आढावा शासन घेत आहे. यादरम्यान, सांगली, मिरज व तासगाव शासकीय रुग्णालयांत खुद्द अधिष्ठात्यांनीच झाडाझडती घेतली. वरिष्ठ डॉक्टरांच्या कामकाजाविषयी महाविद्यालय परिषदेच्या बैठकांतही चर्चा झाली. त्यावेळी अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. सर्जिकल अतिदक्षता विभाग, मेडिसीन अतिदक्षता विभाग, नवजात अर्भकांचा अतिदक्षता विभाग व आकस्मिक दुर्घटना विभागात पाहणीवेळी फक्त एक किंवा दोन कनिष्ठ निवासी डॉक्टर आढळले.रुग्णाच्या जीविताची खऱ्या अर्थाने जबाबदारी असलेले वरिष्ठ निवासी डॉक्टर किंवा सहायक प्राध्यापक सहसा उपस्थित नसतात. त्यामुळे अनेकदा रुग्णाच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार होतो. काहीवेळा रुग्णाच्या तपासणीनंतर रोगनिदान होईपर्यंत, त्याला अपघात वैद्यकीय विभागातच बसवून ठेवले जाते. कधीकधी तब्बल पाच तासांपर्यंत पुढील उपचारांच्या प्रतीक्षेत थांबवून ठेवले जाते.वास्तविक सर्व प्रकारच्या अतिदक्षता, अपघात विभागातील गंभीर व अतिगंभीर रुग्णांची सखोल तपासणी आवश्यक आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टर, सहायक प्राध्यापक किंवा पथक प्रमुखांनी स्वत: तपासून उपचार करण्याचे निर्देश आहेत; पण त्याऐवजी कनिष्ठ निवासी डॉक्टरांकडे रुग्ण सोपविला जातो. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये महाविद्यालयीन परिषदेच्या बैठकांत अधिष्ठात्यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या होत्या. शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र व औषध वैद्यकशास्त्र विभागांच्या प्रमुखांना स्पष्टपणे सांगितले होते. तरीही कार्यवाही झाली नाही. परिणामी, त्यांनी कामाचे सुस्पष्ट वेळापत्रक सादर करावे, असे आदेश अधिष्ठात्यांना द्यावे लागले.

आदेशात म्हटले आहे की, सर्व चिकित्सालयीन व तातडीच्या रुग्णसेवेशी संबंधित विभाग प्रमुखांनी वेळापत्रक द्यावे. बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग येथील दररोजच्या कामाचे वेळापत्रक सादर करावे. त्यात मोबाइल क्रमांकही नोंद असावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असेच वेळापत्रक वैद्यकीय अधीक्षकांनी सादर करायचे आहे. वेळापत्रकाचा आठवडा संपण्यापूर्वी एक दिवस अगोदर पुढील वेळापत्रक अधिष्ठात्यांच्या स्वीय सहायकाला द्यायचे आहे.

उद्रेक झाल्यास जबाबदार कोण?

अधिष्ठात्यांनी स्पष्ट केले की, डॉक्टरांच्या उपस्थितीअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांचा उद्रेक होऊ शकतो. त्यांनी तक्रार केल्यास किंवा कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास कारवाई करावी लागते. या स्थितीत डॉक्टरांचे वेळापत्रक आवश्यक आहे. पाहणीदरम्यान आढळलेल्या गंभीर व दखलपात्र बाबींच्या अनुषंगाने आदेश जारी करण्यात आले आहेत.

डॉक्टरांच्या कामाची धक्कादायक पद्धत

  • रुग्णांना अनेकदा वेळेत दाखल करून घेतले जात नाही.
  • कनिष्ठ निवासी डॉक्टरांकडे रुग्णाला सोपविले जाते.
  • तपासणीनंतर रोगनिदान होण्यासाठी पाच तासांपर्यंत रुग्णाला ताटकळत बसवून ठेवले जाते.
  • नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागासारख्या संवेदनशील विभागातही वरिष्ठ डॉक्टर अनेकदा नसतात.
टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर