शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’च्या आवर्तनाचे आदेशच नाहीत!--- लोकमत विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:34 IST

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे सोमवारी सायंकाळी अधिकाºयांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणी सोडण्यात येणार

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी असे कोणतेही आदेश अजून तरी कोणीही दिले नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, लाभक्षेत्रातील शेतकरी व विरोधी पक्षांचा वाढता असंतोष पाहता, पाणी सोडण्यासाठी खा. संजयकाका पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गेल्या महिनाभरापासून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. वाढती थकबाकी व थकबाकी वसुलीस शेतकऱ्यांकडून अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने आवर्तनाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. एकीकडे पाणी लांबत असतानाच लाभक्षेत्रातील शेतीचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर खा. पाटील यांनी शासनदरबारी विशेष प्रयत्न करून योजनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत तरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांकडे पाणी सोडण्याबाबतचे कोणतेही आदेश नव्हते.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांबरोबरच कॉँग्रेस, राष्टÑवादीसह इतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाणी सोडण्यासाठी मिरजेत मोर्चा काढला होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळेच भाजप नेत्यांची धावपळ सुरू होती.दुसरीकडे जिल्ह्यातील टेंभू व ताकारी योजनेप्रमाणे थकबाकी वसुलीस प्रतिसाद देत पाणी मिळावे यासाठी शेतकºयांकडूनही कोणतेही पाऊल टाकले जात नसल्याचे चित्र आहे.तिन्ही योजनांसाठी : पन्नास कोटींचा निधीम्हैसाळ योजना तातडीने सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ५० कोटी रुपये मंजूर केले असून त्यासंबंधीच्या कागदपत्रांवर सहीदेखील झाल्याची माहिती खा. संजयकाका पाटील यांनी सोमवारी रात्री दिली. मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील म्हैसाळ (२९.६६ कोटी), टेंभू (१७.५ कोटी) आणि ताकारी (३ कोटी) या तिन्ही योजनांची थकबाकी या निधीतून भरली जाणार आहे. विशेषत: थकबाकीमुळे सध्या बंद असलेल्या ‘म्हैसाळ’ची थकबाकी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून तातडीने भरली जाणार असून पाणी सुरू करण्यात येणार आहे.

धडपडीला यश नाहीरविवार दि. ११ रोजी मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा दौºयावर येणार होते व त्यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळ येथे शेतकरी मेळावा होणार होता. या मेळाव्याच्या अगोदर पाणी सुटावे, यासाठी खा. पाटील प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही घेतली होती. मात्र, अद्याप यास यश आले नसल्याचे चित्र आहे.तीस कोटींवर थकबाकीम्हैसाळ योजनेची एकूण ३४ कोटी ५० लाखांची थकबाकी असून यातील साडेपाच कोटी शासनाने भरले आहेत. त्यामुळे आता थकबाकी २९ कोटींवर आहे. प्रशासनातर्फे विविध मार्गाने वसुलीसाठी प्रयत्न केले जात असले तरी त्यास प्रतिसाद मिळत नाही.

म्हैसाळ योजनेच्या थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यास शेतकºयांकडून प्रतिसाद मिळत नाही. पाणी सोडण्याबाबतही शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.- सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता

 

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक