शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

...तर माझ्या गाडीवर दगड पडले असते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:33 IST

सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरोधात बोललो असतो तर माझ्याच गाडीवर दगड पडले असते, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता ...

सांगली : सरकार कोणतेही असो, केवळ शेतकºयांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात संघर्ष उभा केला. शेतकºयांना फसवले जात असल्याने शेतकºयांत सरकारबद्दल रोष आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या गाड्यांवर दगड पडत आहेत. शेतकºयांचे प्रश्न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरोधात बोललो असतो तर माझ्याच गाडीवर दगड पडले असते, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता खा. राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.हुतात्मा गौरव पुरस्काराच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आलेल्या खा. शेट्टी यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर झालेली दगडफेक व त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खा. शेट्टी यांनी जोरदार हल्लाबोल केला.शेट्टी म्हणाले की, शेतकºयांसाठी उभारलेल्या या चळवळीत व्यक्तीव्देषाला कधीच थारा दिला नाही. संघटनेचे आंदोलन एका व्यक्तीच्या विरोधात नसून, सरकारच्या धोरणाच्याविरोधात आहे. शेतकºयांत सरकारबद्दल असंतोष असून, त्या रोषाला प्रत्येक मंत्र्याला सामोरे जावे लगणार आहे. सरकारकडून शेतकºयांना फसवणुकीचे काम सुरू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या सन्मान योजनेतून शेतकºयांचा अपमानच करण्यात येत आहे. तूर खरेदी करताना सांगण्यात एक येते व परिस्थिती वेगळीच आहे. ज्यांच्या विरोधात आज आंदोलने सुरू आहेत, त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तीविरोधात आम्ही आंदोलने उभारली होती.इस्लामपुरात शेट्टींना फिरकू न देण्याचा व ताकारी येथील सभा उधळून लावण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे यावर खा. शेट्टी म्हणाले की, माझा नारदासारखा संपूर्ण राज्यात संचार सुरू असतो. आजवर मला कोणी अडवले नाही आणि पुढेही कोणी अडविण्याची शक्यता नाही.ते तर खंडणीबहाद्दर!स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इस्लामपूर येथील कार्यालय फोडण्यात आले. यावर खा. राजू शेट्टी म्हणाले की, कार्यालय फोडणारे कोण आहेत, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. बलात्काराच्या आरोपातील, खुनाचे गुन्हे असलेल्या खंडणी बहाद्दरांनी हा हल्ला केला आहे. ते कोणत्या पक्षात, कोणत्या संघटनेत आहेत, हे लवकरच जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.