शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या तत्कालीन कार्यकारी संचालकाला अटक

By admin | Updated: April 20, 2017 23:06 IST

‘कृष्णा’च्या तत्कालीन कार्यकारी संचालकाला अटक

कऱ्हाड : कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालकांना बुधवारी रात्री उशिरा कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. अशोक श्रीरंग नलवडे (रा. मंगळवेढा) असे त्यांचे नाव आहे. अशोक नलवडे हे सध्या मंगळवेढ्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत.रेठरे बुद्रुक-शिवनगर येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला आहे. कारखान्याच्या ७८४ ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या नावे बोगस स्वाक्षऱ्या करून प्रत्येकी सात लाख रुपयांप्रमाणे ५८ कोटींचे कर्ज काढण्यात आले होते. या कर्जाबाबत ऊसतोडणी वाहतूकदार अनभिज्ञ असतानाच अचानक त्यांना कर्जाची परतफेड करण्यासंदर्भात बँकेकडून नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतर या प्रकाराचा भांडाफोड झाला. ४ आॅगस्ट २०१६ रोजी तांबवे (ता. वाळवा) येथील यशवंत पाटील या वाहतूकदाराने याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार तपास सुरू असताना सुरुवातीलाच कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी आठ माजी संचालकांनाही पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक नलवडे हे सध्या मंगळवेढ्यातील दामाजी साखर कारखान्यात कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक कांबळे यांच्यासह एक पथक बुधवारी मंगळवेढ्याला गेले. सायंकाळी नलवडे यांना तेथून पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा कऱ्हाडात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.कोठडीत रवानगीअटकेची कारवाई केल्यानंतर अशोक नलवडे यांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी नेले. त्यावेळी त्यांची प्रकृती सुस्थितीत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दुपारी नलवडे यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस प्रक्रिया राखून ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.