शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल करून तरूणाने घेतली विहिरीत उडी, तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडला 

By शरद जाधव | Updated: February 1, 2023 23:36 IST

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत रोहित कांबळे हा आपल्या कुटुंबीयांसह संजयनगर परिसरात राहण्यास होता. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रोहितने उर्मिलानगर येथील विहिरीत उडी घेतली होती.

सांगली : शहरातील उर्मिलानगरमध्ये असणाऱ्या एका विहिरीत उडी घेतलेल्या तरूणाचा मृतदेह बुधवारी शोधपथकाला आढळून आला. राेहित कांबळे, असे मृत तरूणाचे नाव आहे. कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल करून रविवार (दि. २९ जानेवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास त्याने विहिरीत उडी घेतल्याचेही समोर आले आहे. संजयनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत रोहित कांबळे हा आपल्या कुटुंबीयांसह संजयनगर परिसरात राहण्यास होता. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रोहितने उर्मिलानगर येथील विहिरीत उडी घेतली होती. यापूर्वी त्याने कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल केला होता. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून गळाच्या साह्याने शोध सुरू होता. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची संजयनगर पोलिस ठाण्यात नाेंद असून, रोहितच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेWaterपाणी