शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

विरोध डावलून जुना बुधगाव रस्त्यावरील वाहतूक वळवली, वाहतूक कोंडीचा धोका वाढला

By अविनाश कोळी | Updated: July 13, 2024 21:08 IST

सांगली : सामाजिक संघटना, नागरिकांचा विरोध असतानाही जुना बुधगाव रस्त्यावरील पंचशीलनगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. ...

सांगली : सामाजिक संघटना, नागरिकांचा विरोध असतानाही जुना बुधगाव रस्त्यावरील पंचशीलनगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी येथील वाहतूक वळविण्यासाठी लोखंडी बॅरिकेटस् लावण्यात आले. निम्म्या रस्त्यावरून आता वाहतुकीची कसरत नागरिकांना करावी लागणार आहे.

केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम्’ या योजनेंतर्गत जुना बुधगाव रोडवरील पंचशीलनगर येथील रेल्वे फाटक क्रॉसिंग नंबर १२९वर नवा उड्डाणपूल होत आहे. हा रस्ता चिंतामणीनगर उड्डाणपुलाला पर्यायी रस्ता म्हणून वापरला जात होता. त्यावरही आता कोंडी होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या पुलाच्या कामास परवानगी दिली. सामाजिक न्याय भवनापासून रेल्वे गेट, तसेच पंचशीलनगरपर्यंत रस्त्याच्या अर्ध्या भागात काम व अर्धा रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. दुचाकी व तीनचाकींसाठीच हा रस्ता खुला राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर सांगलीतील सामाजिक संघटना, रिक्षा संघटना, तसेच नागरिकांनी या कामास विरोध दर्शविला. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल उभारल्याशिवाय नवा रेल्वे पूल उभारला जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. हे काम बंद पाडण्याचा इशाराही देण्यात आला होता. तरीही शनिवारी सकाळपासून पुलाच्या उभारणीची तयारी याठिकाणी सुरू करण्यात आली. रस्त्याचा ६० टक्के भाग पुलाच्या कामासाठी ताब्यात घेण्यात आला आहे. उर्वरित रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. बॅरिकेटस् उभारणी पूर्ण झाली आहे.

चिंतामणीनगर पूल कधी होणार ?चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. १५ ऑगस्टपर्यंत त्यास मुदत दिली होती. ते कधी पूर्ण होईल, याची खात्रीशीर माहिती कोणालाही नाही. अशा स्थितीत आता पर्यायी जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात होणार आहे.

या संघटनांनी केला विरोधसांगली जिल्हा रिक्षा चालक, मालक संघटना कृती समिती, करवीर रिक्षा संघटना, हिंदू एकता आंदोलन, भाजप, राष्ट्रवादीने या पुलाच्या कामास विरोध दर्शविला आहे. प्रसंगी हे काम बंद पाडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पाऊस वाढल्यास हालपावसाचा जोर सध्या कमी आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर सांगलीतील वाहतूक कसरतीची होणार आहे. चारचाकी वाहनांसाठी कर्नाळ रस्त्यावरील पर्यायी वाहतूक अडचणीची होईल. हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. याशिवाय ३५ फुटांवर कृष्णा नदीचे पाणी गेल्यानंतर सांगलीचा कर्नाळ रस्ता बंद होतो. जुना बुधगाव रस्त्यावर रेल्वे गेट ओलांडल्यानंतर अत्यंत अरुंद रस्ता असल्याने या ठिकाणीही वाहतूक कोंडी होणार आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीroad transportरस्ते वाहतूक