शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात घुमणार मिरजेतील वाद्यांचा आवाज; गणेशोत्सवामुळे ढोल, ताशाला मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 19:03 IST

प्रांतनिहाय वाद्यांची परंपरा वेगळी

सदानंद औंधेमिरज : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच राज्यभरातील गणेश मंडळांसह विविध मंदिर व्यवस्थापनांनी, संस्थांनी मिरजेतील वाद्यांची खरेदी सुरू केली. मागणी वाढल्याने मिरजेतील वाद्यांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल नोंदली गेली आहे. महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातूनही मिरजेतील वाद्यांना मागणी आहे.धार्मिक कार्यक्रम, सण उत्सवासाठी लागणारी सर्व वाद्ये मिरजेतील होलसेल बाजारात उपलब्ध असल्याने या वाद्यांना पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणासह कर्नाटक व गोव्यातूनही मागणी आहे.मिरज शहरात येथे ढोल, ताशा, पखवाज, ढोलकी, वीणा, संबळ, हलगी, लेझीम, घुमका, झांज, टाळ, मृदंग, तबला, डग्गा, हार्मोनियम ही वाद्ये व बँजो पथकाला लागणारे साहित्य मिळते. मिरजेत तंतुवाद्यांसह गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, जयंती उत्सव, भजनी मंडळे, वाद्य पथकांना लागणारी सर्व वाद्ये मिळतात. वाद्यांना मागणी असल्याने प्रत्येक वर्षी श्रावण व गणेशोत्सवात मिरजेत वाद्यांच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे विक्रेते संजय मिरजकर यांनी सांगितले.कातडी धनगरी ढोल फक्त मिरजेतच मिळते. विविध गावांत किरकोळ विक्री करणारे विक्रेतेही मिरजेतून ही वाद्ये खरेदी करतात. विक्रीसह वाद्ये दुरुस्ती मिरजेत होत असल्याने मिरजेत वाद्ये खरेदीसाठी राज्यातील वाद्यपथके व व्यापारी येतात. मिरज परिसरात ढोलासाठी कातड्याची पाने तयार होतात. स्टील ढोलासाठी फायबरचे पान उत्तर प्रदेशातील मेरठ येथून येते. पंढरपूर, आळंदी, पैठण यासह अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व मंदिरात मिरजेतून वाद्ये जातात.विविध गावांतील वारकरी मंडळे, भजनी मंडळे वीणा, पखवाज, तबला, डग्गा, ढोलकी, हार्मोनियम मिरजेतून खरेदी करतात. मंदिरात वापरासाठी स्वयंचलित आरती मशीनही उपलब्ध आहे. वाद्यांच्या किमती स्थिर असल्या तरी लाकूड महागल्याने ढोलकी, तबला, डग्गा ही लाकडी वाद्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत महागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

प्रांतनिहाय वाद्यांची परंपरा वेगळीगणेशोत्सवात कोकणात पखवाज, ढोलकी, टाळ, स्टील ढोलवादन होते. गोव्यात पखवाज, हार्मोनियम, संबळ वादन केले जाते. मराठवाडा, विदर्भ, नाशिक येथे ढोल या नावाने ओळखले जाणारे स्टील ढोल-ताशे वादन होते. विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या आकारांतील ढोल वाजविले जातात. कर्नाटकात मोठ्या आकाराच्या हलगीचा वापर होतो.

वाद्यांच्या किमती

  • धनगरी ढोल लाकडी - ५ ते १२ हजार
  • स्टील ढोल - २ ते ४ हजार
  • ढोलकी - २ ते ३ हजार
  • हार्मोनियम - ८ ते २५ हजार
  • तबला डग्गा - ४ ते ६ हजार संबळ - दीड हजार रुपये जोडी
  • टाळ - ३०० ते १२०० रुपये ताशा - स्टील ८०० रुपये
  • तांबे पितळेचा ताशा- ५ ते १५ हजार झांज ५०० ते १५०० रुपये.