शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर, लेहमधून सांगली जिल्ह्यातील २५० पर्यटक मजल-दरमजल करीत परतले घरी

By अविनाश कोळी | Updated: May 13, 2025 16:05 IST

पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला

अविनाश कोळीसांगली : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होण्यापूर्वीच देशाच्या उत्तरेकडील पर्यटन स्थळांच्या सहलीवर गेलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला. काही भागातील विमान वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीचा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरला होता. मजल-दरमजल करीत अडीचशे पर्यटकांनी घर गाठले.जिल्ह्यातील पर्यटकांनी महिन्यापूर्वी लेह-लडाख, काश्मीर, चंदीगढ आदी भागात सहलींचे नियोजन केले होते. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पर्यटन स्थळावर पर्यटक पाेहचले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून १३ प्रवासी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये चंडीगड, अमृतसर, जयपूर, हैदराबाद, कोची, जोधपूर, राजकोट आणि सुरत या शहरांकडे जाणाऱ्या हवाई वाहतुकीचा समावेश होता.सांगली जिल्ह्यातील ज्या पर्यटकांनी या शहरांसाठी विमानांचे बुकिंग केले होते. त्यांना ऐनवेळी ते रद्द करावे लागले. मात्र, ही सेवा बंद होण्यापूर्वी जिल्ह्यातील २५० हून अधिक प्रवासी पर्यटनस्थळी दाखल झाले होते. त्यांचा परतीचा प्रवास हवाई वाहतूक बंद झाल्याने अडचणीत आला होता.टूर्स ॲंड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून पॅकेज त्यांनी घेतले होते. परतीच्या प्रवासाचे पर्यायी नियोजन करण्यासाठी कंपन्यांनी पर्यटकांना आणखी काही दिवस पर्यटनस्थळी थांबविले होते. दोन्ही देशांतील तणावाची स्थिती थोडी कमी झाल्यानंतर रस्ते वाहतुकीचा पर्याय त्यांनी स्वीकारला.

परतीचा प्रवास झाला त्रासदायीवाहने बदलत कसरत करीत २५० हून अधिक प्रवाशांना घरी परतावे लागले. सहल नियोजन केलेल्या कंपन्यांनी याची व्यवस्था केली होती. मात्र, परतीचा प्रवास खूपच लांबल्याने पर्यटकांना त्रास झाला. घरी परतल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लेहमध्येच जवळपास २०० जणांचा ग्रुप अडकला होता. त्या भागातून परतीसाठी हवाई वाहतूक नसल्याने रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारला. त्यांना सुखरूप सांगलीला आणले. या काळात खूप कसरत करावी लागली. - मंगेश शहा, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन