शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ३७ लाखांच्या फसवणूकप्रकरणी ‘वेफा’च्या संचालकाचा पोलीस ताबा घेणार

By शरद जाधव | Updated: September 17, 2022 21:14 IST

सहा जणाविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली : जादा परताव्याच्या आमिषाने ३७ लाख ४४ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या वेफा मल्टिट्रेड प्रा. लि. कंपनीचा संचालक ज्ञानेश्वर कृष्णदेव हिप्परकर (रा. गोंधळेवाडी, ता. जत) याचा आर्थिक गुन्हे शाखा आता ताबा घेणार आहे. हिप्परकर याच्यासह सहा जणाविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील सर्कीट हाऊसजवळील एका बंगल्यात वेफा मल्टिट्रेड प्रा. लि. ही कंपनी सुरू करण्यात आली होती. गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी रकम घेतली होती.

३७ लाख ४४ हजार रुपयांच्या फसवणूकप्रकरणी विद्याधर भूपाल माणगावे (रा. शिरढोण, ता. शिरोळ) यांनी वेफा कंपनीचे संचालक ज्ञानेश्वर कृष्णदेव हिप्परकर (रा. गोंधळेवाडी, ता. जत), प्रकाश काकासाहेब लांडगे (रा. करगणी, ता. आटपाडी), प्रशांत बंडोपंत ओतारी (रा. गावभाग, सांगली), रामहरी जगन्नाथ पवार (रा. बुधगाव), बबन लक्ष्मण मस्कर (रा. समडोळी), निशा नितीन पाटील (रा. अभयनगर, सांगली) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांनी प्रशांत ओतारी व बबन मस्कर यांना अटक केली होती.

या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आता संचालक हिप्परकर याचा ताबा सोमवारी घेण्यात येणार आहे. दरम्यान, वेफा मल्टिट्रेड कंपनीने अजूनही कोणाची फसवणूक केली असल्यास अशा गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे

टॅग्स :fraudधोकेबाजी