शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील कामेरीत सापडलेल्या गव्याचा अखेर मृत्यू, वनअधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप

By श्रीनिवास नागे | Updated: December 6, 2022 17:24 IST

पाऊस आणि ऊस क्षेत्रात जास्त काळ लपून बसल्याने आजारी असलेल्या या गव्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. मात्र, अखेर त्याचा मृत्यू झाला

सांगली : कामेरी (ता. वाळवा) येथे आढळलेला गवा काल, सोमवारी वन विभागाने ताब्यात घेतला, मात्र रात्री उशिरा त्याचा वन विभागाच्या इस्लामपूर येथील कार्यालयात मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच गव्याचा मृत्यू झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.कामेरी येथील शेती पाणीपुरवठा योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या परिसरात शुक्रवार, दि. २ डिसेंबर रोजी ऊसशेतीत काही शेतकऱ्यांना गवा दिसला. त्यांनी तात्काळ वनखात्याला कळविले. त्यानंतर वनविभागाच्या दोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी गावात येत गव्याच्या बंदोबस्तासाठी मोहीम उघडली; परंतु त्यांना तो पकडता आला नाही.अखेर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी याबाबत वनक्षेत्रपाल सचिन जाधव व वनपाल सुरेश चरापले यांना दूरध्वनीवरून या गव्याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी या कर्मचाऱ्यांचा दूरध्वनी घेतला नाही. त्यातच रविवार, दि. ४ रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. ऐन पावसात एक महिला कर्मचारी आणि काही कर्मचारी गव्याला ताब्यात घेण्यासाठी गस्त घालत होते. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते. अखेर संबंधित महिला कर्मचाऱ्याने थेट सांगलीच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे यांना मोबाइलवरून माहिती दिली. त्यांनी तातडीने शिराळा येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या कालावधीत गव्यास अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. त्याची प्रकृतीही नाजूक बनल्याचे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.काल, सोमवारी (दि. ५) वनखात्याने त्याला पकडून क्रेनच्या साहाय्याने वाहनात घालून इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसरातील वन खात्याच्या कार्यालयात आणले. पाऊस आणि ऊस क्षेत्रात जास्त काळ लपून बसल्याने आजारी असलेल्या या गव्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला; परंतु सोमवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांनी माहिती देताच वनअधिकाऱ्यांनी गांभीर्य राखून त्यास वेळेवर पकडले असते, तर त्याचा मृत्यू झाला नसता, अशा प्रतिक्रिया कामेरी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग