शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत गणेश तलावाच्या प्रवेशद्वारास माजी संस्थानिकांनी ठोकले कुलूप 

By अविनाश कोळी | Updated: September 2, 2023 19:22 IST

महापालिकेसोबत कराराचा वाद : आयुक्तांकडुन पाहणी

मिरज : मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलाव आपल्या मालकीचा असल्याचा फलक लावून माजी संस्थानिक गंगाधरराजे पटवर्धन यांनी तलावाच्या प्रवेशद्धारास कुलूप ठोकले आहे. गणेशोत्सव दोन आठवड्यावर आला असताना तलाव ताब्यात घेतल्याने महापालिका आयुक्तांनी तलावास भेट देऊन पाहणी केली.मिरजेत शेकडो वर्षाची गणेश विसर्जन परंपरा असलेला तलाव संस्थानिक पटवर्धन यांच्या मालकीचा आहे. गणेश तलाव ही मिळकत श्रीमंत राजेसाहेब गंगाधरराव पटवर्धन मिरज सरकार यांच्या खासगी मालकी हक्काची मिळकत आहे. या मिळकतीत कोणीही विनापरवाना प्रवेश करू नये. प्रवेश केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देणारा फलक लावून प्रवेशद्वारास कुलूप लावले आहे.

पटवर्धन यांनी तलावाच्या सुशोभिकरण व देखभालीसाठी दहा वर्षापूर्वी महापालिकेसोबत करार करुन वार्षिक भाड्याने तलाव महापालिकेकडे सोपविला होता. या कराराची यावर्षी जून महिन्यात मुदत संपल्यानंतर कराराच्या नूतनीकरणासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र महापालिका प्रतिसाद देत नसल्याने तलाव पुन्हा ताब्यात घेतल्याचे पटवर्धन यांचे वकील श्रीकृष्ण पोतकुळे यांनी सांगितले. मात्र तलावात गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा सुरु राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन तलावात होईल. मात्र विसर्जन व्यवस्थेसाठी आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेची अडचण होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीGanesh Mahotsavगणेशोत्सवmiraj-acमिरज