शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंना न्यायालयाचा दणका! 'या' प्रकरणातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

By श्रीनिवास नागे | Updated: February 3, 2023 18:44 IST

इस्लामपूर (सांगली) : कोकरूड (ता. शिराळा) येथे १४ वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्यावतीने येथील ...

इस्लामपूर (सांगली) : कोकरूड (ता. शिराळा) येथे १४ वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्यावतीने येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेला पुनरावलोकन (रिव्हिजन) अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. शिराळा न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यातून ठाकरे यांना दोषमुक्त करावे, अशा आशयाचा हा अर्ज होता. राज ठाकरे यांच्याविरुध्द कोकरुड पोलिस ठाण्यात २१ ऑक्टोबर २००८ रोजी भारतीय दंडसंहिता कलम १४३,१०९ व ११७ आणि मुंबई पोलिस अधिनियमाच्या कलम १३५ अन्वये फिर्याद दाखल आहे. त्यानुसार ठाकरे यांच्याविरुध्द शिराळा येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहे, मात्र अद्याप त्यांच्याविरुध्द दोषारोप ठेवण्यात आलेला नाही. या खटल्यातून ठाकरे यांना दोषमुक्त करावे यासाठी त्यांच्यावतीने इस्लामपूर येथील जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात पुनरावलोकन अर्ज दाखल होता.फिर्यादीमध्ये ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही. यामुळे त्यांच्याविरुध्द दोषारोप निश्चिती करू नये, असा युक्तिवाद ठाकरे यांच्या वकिलांनी केला. त्यावर सरकार पक्षाच्यावतीने सहायक जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी सांगितले की, ठाकरे यांचा सहभाग आहे किंवा नाही याबाबत जोपर्यंत खटल्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदविले जात नाहीत, तोपर्यंत त्यांच्या सहभागाबाबत मत नोंदविता येणार नाही. त्याचप्रमाणे ही फिर्याद सन २००८ मध्ये दाखल असल्याने आजपर्यंत ठाकरे यांच्यावतीने दोषारोप निश्चितीबाबत कोणताही प्रतिसाद आलेला नाही.यामुळे त्यांच्याविरुध्द दोषारोप ठेवून ही फिर्याद गुणदोषावर चालणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचा दोषमुक्त होण्याचा अर्ज नामंजूर करावा. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा न्यायालयाने राज ठाकरे यांचा दोषमुक्त करण्याबाबतचा अर्ज नामंजूर केला.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरRaj Thackerayराज ठाकरेCourtन्यायालय