शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या वादग्रस्त एलईडी प्रकल्पाला मुदतवाढ, उद्यापासून काम सुरू

By शीतल पाटील | Updated: August 4, 2023 15:40 IST

स्थायी समितीने दोनदा मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला होता

सांगली : महापालिकेच्या एलईडी प्रकल्पावरून गेल्या महिन्याभरात बरेच वादंग निर्माण झाले. सहा महिन्यापूर्वी प्रकल्पाची मुदत संपली होती. ठेकेदार कंपनीने काम थांबविले होते. त्यात स्थायी समितीने दोनदा मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला होता. अखेर शुक्रवारी शासन अटीच्या आधीन राहून मुदतवाढीला स्थायी समितीने मंजुरी दिली. शहरात एलईडी दिवे बसविण्याचे काम उद्या, शनिवारपासून सुरू होईल, असे सभापती धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले.महापालिकेच्या एलईडी प्रकल्पाची मुदत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपली आहे. या प्रकल्पाचे काम सहा महिने बंद आहे. ठेकेदाराने अजून १७ हजार दिवे बसविलेले नाहीत. त्याला पाच कोटीचे बिल अदा करण्यात आले आहे. प्रशासनाने ठेकेदार कंपनीशी चर्चा करून प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. पण स्थायी समितीने प्रकल्पाला मुदतवाढ देण्यास नकार दिला होता.

शुक्रवारी स्थायी सभेत एलईडी प्रकल्पावर चर्चा झाली. यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींची झाडाझडती घेण्यात आली. शासन अटीच्या अधीन राहून प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.सभापती सूर्यवंशी म्हणाले की, शहरात ४८ हजार दिवे बसविले जाणार आहेत. २०० फिडरचे काम महिन्याभरात पूर्ण करण्यात येणार आहे. तर दिवे बसविण्याचे काम शनिवारपासून सुरू करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.

टॅग्स :Sangliसांगली