शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जतच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, माजी आमदार प्रकाश शेंडगेंची मागणी

By संतोष भिसे | Updated: November 24, 2022 16:30 IST

म्हैसाळ योजनेमुळे जत तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांत शेती फुलली, पूर्वेकडील ६५ गावे मात्र तहानलेलीच आहेत.

सांगली : जत तालुक्याच्या समस्यांवर निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणी जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली. जतमधील जनता महाराष्ट्रातच राहणार असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध करतो असेही ते म्हणाले.सांगलीत पत्रकार बैठकीत ते बोलत होते. शेंडगे म्हणाले, तालुक्यातील एकाही गावाने कर्नाटकात जाण्याचा ठराव केलेला नाही, किंवा प्रस्ताव पाठविलेला नाही. २०१२ मध्ये मी आमदार असताना काही गावांनी कर्नाटककडून पाण्याच्या मागणीचे ठराव केले होते. पण त्यावर कर्नाटक शासनाने सकारात्मक कार्यवाही केली नाही. उन्हाळ्यात भीषण टंचाईवेळी मागणी करुनही पाणी दिले जात नाही. हिरेपडसलगी किंवा तुरची बबलेश्वर योजनेतून पाणी मिळू शकते, पण त्यासाठी कर्नाटकात जाण्याची आमची इच्छा नाही.शेंडगे म्हणाले, म्हैसाळ योजनेमुळे जत तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांत शेती फुलली, पूर्वेकडील ६५ गावे मात्र तहानलेलीच आहेत. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत रामपूर-मल्याळ ही १ हजार ८०० कोटी रुपये खर्चाची योजना सादर केली होती, तिला आजतागायत मंजुरी मिळालेली नाही. आतापर्यंत चार सरकारे झाली, पण एकानेही लक्ष दिले नाही. 

सध्याचे पालकमंत्री सुरेश खाडे सहाव्या टप्प्याला मंजुरीची भाषा करत असले, तरी तशी कोणतीही कार्यवाही प्रत्यक्षात नाही. त्यामुळे आम्ही शिष्टमंडळासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. पिण्याचे व शेतीचे पाणी, अनुदानित मराठी शाळा आदी विषय मांडणार आहोत. लक्ष दिले नाही, तर प्रसंगी रस्त्यावरील आंदोलन करु.बोम्मई खोटे बोलत आहेतशेंडगे म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई धडधडीत खोटे बोलत आहेत. कर्नाटकात जाण्यासाठी जतच्या एकाही  गावाने ठराव दिलेला नाही. २०१२ मध्ये झालेले ठराव पाण्यासाठी होते.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटEknath Shindeएकनाथ शिंदेKarnatakकर्नाटक