शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: करुंगली-गुंडगेवाडीला जोडणारा पूल कोसळला, मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:15 IST

वारणावती : करुंगली-गुंडगेवाडीला जोडणारा वारणा डाव्या कालव्यावरील पूल अखेर बुधवारी कोसळला. करुंगली-गुंडगेवाडी, खोतवाडी परिसरातील नागरिक गेल्या कित्येक महिन्यांपासून हा ...

वारणावती : करुंगली-गुंडगेवाडीला जोडणारा वारणा डाव्या कालव्यावरील पूल अखेर बुधवारी कोसळला. करुंगली-गुंडगेवाडी, खोतवाडी परिसरातील नागरिक गेल्या कित्येक महिन्यांपासून हा धोकादायक पूल रहदारीसाठी बंद केला होता.कालव्याच्या मध्यभागी असलेल्या दगडी पिलरचा काही भाग आधीच तुटून पडला होता आणि उर्वरित पूल कधीही कोसळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; पण प्रशासन ‘बघू पुढे काहीतरी’ या धोरणावरच अडगळीला टाकत होतं. ‘लोकमत’ने या समस्येवर सातत्याने आवाज उठवल्यानंतरच पाटबंधारे विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली. बुधवारी दुपारी हा पूल शेवटी कोसळला.

जनतेचा आवाज दुर्लक्षित करू नका, अन्यथा असे धोकादायक पूल रस्ते कोसळतात. आता तरी नव्याने आणि सुरक्षित पूल उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक म्हणून आम्ही केली आहे. - चंद्रकांत गुंडगे, ग्रामस्थ, गुंडगेवाडी.कोकरूड पोलिस ठाण्याअंतर्गत करंगुली-गुंडगेवाडी या गावांच्या दरम्यान असलेले वारणा तीर कालव्याचे १२ किलोमीटरच्या गाव पुलाचे दगडी पिलरचे सततच्या आवर्तनामुळे नुकसान होऊन तो ढासळू लागला होता. पाटबंधारे विभागाने कळविल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी बॅरिकेड्स लावून आम्ही याआगोदरच बंद केला होता. - जयवंत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, कोकरूड. 

करुंगली-गुंडगेवाडी (ता. शिराळा) येथील गावपूल वारणा डाव्या कालव्याचा मधला पिलर ढासळून पूल कोसळला आहे. सध्या प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून दोन्ही बाजूंना माती व मुरमाचा ढिगारा टाकून बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे या पुलावरून वाहतूक करू नये. - आरती बारटक्के, उपकार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे (उत्तर विभाग)