शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता बहिण-भावाचा मृतदेह अखेर दुसऱ्या विहिरीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 15:58 IST

तीन - चार दिवस पोलिसांचा सुरू असलेला तपास उघडकीस आला आहे. 

 जत :

तालुक्यातील अमृतवाडी येथील लहान बहीण व भाऊ बेपत्ता झालेले दोघांचे मृतदेह घाराजवळीलच शेजारील दुसऱ्या विहिरीत दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत. त्यामूळे तीन - चार दिवस पोलिसांचा सुरू असलेला तपास उघडकीस आला आहे. 

मयत सुलोचना गवळी (वय ५) व इंद्रजित गवळी (वय ३) यांचे नाव आहे. चार दिवसापूर्वी गुरूवार दि. ९ फेब्रुवारी रोजी अमृतवाडी येथील दोन लहान मुले बेपत्ता झाल्याने पोलीसांनी गावात सर्व गाव जंग जंग पछाडले मात्र त्यांना हाती कांहीच लागले नाही. शेततळ्यात व विहिरीतील पाणी उपसा करून ही सापडले नाहीत. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे अमृतवाडी गावात तळ ठोकून होते. जत येथील द्राक्ष बागायतदार दिपक हत्ती यांच्या शेतात काम करण्यासाठी नाशिक हून एक जोडपे ठेवले होते. जोडप्यातील पत्नी ही आजारी असल्याने तिला खाजगी रूग्णालयात पतीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले होते. त्यामूळे त्यांची चार मुले घरी होती. बहीण- भाऊ असे दोन लहान मुले  सायंकाळी वडील घरी आले. दोन मुले झोपली होती तर दोन मुले घरी नसल्याने त्यांचा शोध घेऊन जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. लहान मुले लांब जाऊ शकणार नाहीत, हा अंदाज घेऊन जवळच खेळत खेळत विहीर अथवा शेत तलावात मुले पडली असावीत, असा अंदाज घेऊन विहीर व शेत तलावातील पाणी उपसून काढण्यात आले. मात्र त्यात मुले सापडली नाहीत. मात्र काल रविवारी या दोघांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने गावात शोककळा पसरली आहे. चार दिवस पोलीस अमृत्वाडी गावात तळ ठोकून होते. अखेर दोघांचेही मृतदेह सापडल्याने पोलीसांनी देखील सुटकारा सोडला.