शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशाची सांगता, सर्व शाखा हाउसफुल्ल; सहा महिने चालली प्रक्रिया 

By अविनाश कोळी | Updated: December 1, 2023 12:04 IST

१४१ विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच

अविनाश कोळीसांगली : राज्यातील वैद्यकीय शाखेच्या प्रवेश प्रक्रियेची सांगता गुरुवारी ३० नोव्हेंबरला झाली. सहा महिने चाललेल्या या प्रक्रियेत एम. बी. बी. एस., दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी अशा सर्व शाखा हाउसफुल्ल झाल्या. शेवटची फेरी विनापरवाना ऑफलाइन घेतली. त्यामध्ये एम. बी. बी. एस.ला प्रवेश मिळालेल्या १४१ विद्यार्थ्यांचे भवितव्य अद्याप अधांतरी आहे.नीट-२०२३ चा निकाल यंदा १३ जूनला लागल्यानंतर लगेचच वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या प्रक्रियेत यावर्षी अनेक बदल दिसून आले. महाराष्ट्रात एम. बी. बी. एस. तसेच आयुर्वेदच्या प्रवेशावेळी झालेल्या काही चुकांमुळे विद्यार्थ्यांना फटका बसला. एम. बी. बी. एस.ची शेवटची फेरी ऑफलाइन घेतली गेल्याने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने १४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द ठरविले. त्यामुळे त्यांचे भवितव्य अद्याप अधांतरी आहे.आयुष शाखेच्या सर्व फेऱ्या ऑनलाइन पार पडल्या. मात्र, शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये १४ नवीन आयुर्वेदिक कॉलेजमधून १ हजार ११० जागा अचानक वाढल्यामुळे आधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण असूनही त्यांचा आयुर्वेद शाखेचा प्रवेश हुकला.

कोणत्या शाखेसाठी किती जागा होत्या?महाराष्ट्रात यंदा एम. बी. बी. एस.च्या ९,७९६, दंत वैद्यकीयच्या २,८७४, आयुर्वेदच्या ७,६८४ आणि होमिओपॅथिकच्या ४,२३८ जागा उपलब्ध होत्या. बहुतांश सर्व जागा भरल्या गेल्या.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ६ महिने सुरू राहिल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांना ताणतणावास सामोरे जावे लागले. काही महाविद्यालयांत अगोदरच अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे उशिरा प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे हा कालावधी कमी करणे आवश्यक आहे. यावर्षी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अनेक चांगले बदल झाले असले तरीही काही त्रुटीही दिसून आल्या. त्या दूर करणे गरजेचे आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीMedicalवैद्यकीय