शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चिखलहोळत ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : इस्लामपूरहून विटामार्गे टेंभूर्णीकडे ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने दोन्ही ट्रॉली पलटी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : इस्लामपूरहून विटामार्गे टेंभूर्णीकडे ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने दोन्ही ट्रॉली पलटी होऊन झालेल्या भीषण अपघात झाला. यात ट्रॅक्टरमधील पाच ऊसतोड मजूर जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विटा ते माहुली रस्त्यावर चिखलहोळ फाट्याजवळ घडली. अपघातातील जखमी नांदेड जिल्ह्यातील वहाद (ता. खंदार) गावचे रहिवासी आहेत.

बुधवारी सकाळी २५ ऊसतोड मजुरांना घेऊन ट्रॅक्टर इस्लामपूरहून विटा, मायणीमार्गे टेंभूर्णीकडे चालला होता. सकाळी ८ च्या सुमारास ट्रॅक्टर चिखलहोळ फाट्याजवळ आला असता चालकाचा ताबा सुटून पाठीमागील दोन्ही ट्रॉली रस्त्याच्या बाजूला पलटी झाले. त्यानंतर ट्रॅक्टर नाल्यात पलटी झाला. या अपघातात अमोल मुक्तीराम जाधव, राजू मुक्तीराम जाधव, मोहन पांडुरंग वाघमारे, मुरलीधर धोंडिबा जाधव, व्यंकटी निवृत्ती जाधव असे पाचजण किरकोळ जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी तातडीने रुग्णवाहिका पाठवून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ट्रॅक्टरमध्ये सुमारे २५ ऊसतोड मजूर होते. परंतु, कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.