शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिने मानधनापासून ग्रामरोजगार सेवक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:34 IST

अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : तुटपुंज्या मानधनावर काम करणारे ग्रामरोजगार सेवक काम करूनही शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे तब्बल दहा महिन्यांच्या मानधनापासून वंचित आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन का थकविले आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यात ग्रामस्तरावरील विविध कामे करण्यासाठी शासनाने ६० ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती केली आहे. ...

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : कवठेमहांकाळ तालुक्यात लाल फितीचा फटका!

अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : तुटपुंज्या मानधनावर काम करणारे ग्रामरोजगार सेवक काम करूनही शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे तब्बल दहा महिन्यांच्या मानधनापासून वंचित आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन का थकविले आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुक्यात ग्रामस्तरावरील विविध कामे करण्यासाठी शासनाने ६० ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती केली आहे. यामधील ३० सेवकांचे मानधन मोठ्या प्रयत्नानंतर देण्यात आले. अद्यापही ३० ग्रामरोजगार सेवकांचे दहा महिन्यांचे अडीच लाख रुपये मानधन दिलेले नाही. त्यांनी केलेला दोन वर्षाचा प्रशासकीय खर्चही अद्याप देण्यात आलेला नाही.

कवठेमहांकाळ तालुका दुष्काळाशी सामना करत आहे. म्हैसाळ व टेंभूचे पाणी कालव्यात केवळ पूजण्यापुरतेच येते. तालुक्यात मोठा उद्योग नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठी आहे. याचा विचार करून अनेक सुशिक्षित तरुण संसाराचा गाडा चालवण्यासाठी तुटपुंज्या मानधनावर रोजगार सेवक म्हणून काम करीत आहेत. परंतु प्रशासनाला याचे काही देणे-घेणे नाही. तब्बल दहा महिन्यांचे मानधन व दोन वर्षाचा खर्च प्रशासनाने त्यांना दिलेला नाही.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कारभारावर संताप व नाराजी व्यक्त करीत या रोजगार सेवकांनी जिल्हाभर काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.प्रशासनाचे उदासीन धोरण आणि निवडणुकीपुरता या तरुणांचा वापर करणारे लोकप्रतिनिधी, यांच्यामुळे हे रोजगार सेवक काम करूनही उपाशी राहू लागले आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमके काय काम करतात? लोकप्रतिनिधी जनतेचे, तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेत की फक्त ठेकेदारी करण्यासाठी व टक्केवारी घेण्यासाठी? असा प्रश्न जनता विचारू लागली आहे. रोजगार सेवकांचे दहा महिन्याचे थकीत अडीच लाख रुपये मानधन व प्रशासकीय खर्च प्रशासन कधी देणार? लोकप्रतिनिधी रोजगार सेवकांचा प्रश्न कधी सोडवणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकप्रतिनिधी उदासीनया ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनासाठी लोकप्रतिनिधीही उदासीन आहेत. मतांचे राजकारण करण्यापेक्षा त्यांनी तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न आधी सोडवावा, अशी मागणी रोजगार सेवक करीत आहेत. 

शिकूनही हाताला काम मिळत नाही, म्हणून आम्ही रोजगार सेवकाचे काम मानधनावर स्वीकारले. कसा तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. परंतु आठ महिन्याचे मानधन प्रशासनाने दिले नाही. आमच्या केलेल्या कामाचे दामसुद्धा देण्यास प्रशासन विलंब लावत आहे. त्यामुळे आम्ही पुढील आठवड्यत काम बंद करणार आहोत.- तानाजी शिंगाडे, तालुकाध्यक्ष, ग्रामरोजगार सेवक संघटना

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीjobनोकरी