शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

मिरजेत अंत्यविधी साहित्यात दहा लाखांचा गोलमाल

By admin | Updated: March 6, 2015 01:06 IST

पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

सांगली : मिरजेच्या कृष्णाघाट स्मशानभूमीतील अंत्यविधी साहित्यामधील भ्रष्टाचाराचा खुद्द महापौर विवेक कांबळे यांनीच गुरुवारी पत्रकार बैठकीत पर्दाफाश केला. ठेकेदारांकडून करारपत्रानुसार साहित्याचा पुरवठा होत नसून वर्षभरात सुमारे दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत, ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले. महापौर विवेक कांबळे, नगरसेवक सुरेश आवटी, माजी नगरसेवक आनंदा देवमाने, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक किशोर गोंधळेकर यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता मिरजेतील कृष्णाघाट स्मशानभूमीला भेट दिली. त्यानंतर पत्रकार बैठकीत त्यांनी अंत्यविधी साहित्यात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत बॉम्ब टाकला. कांबळे म्हणाले की, मिरजेतील अंत्यविधी साहित्य पुरवठ्याचा ठेका भुजगौंडा उदगावे या ठेकेदाराला दिला आहे. त्याने ठेक्यातील अटी व शर्तींचे पालन केलेले नाही. स्मशानभूमीच्या दर्शनी भागात साहित्य तपशिलाचा फलक लावलेला नाही. करारपत्रानुसार एका मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी तीन क्विंटल लाकूड, तीन लिटर रॉकेल, चार मीटर कापड, तिरडीसाठी दोन काठ्या, दोन मडकी, दोन किलो मीठ, कापूर डबी व सुतळी आदी साहित्य देणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्याला एका मृतदेहामागे २१५० रुपये पालिकेकडून अदा केले जातात. या ठेकेदाराकडून केवळ तीन क्विंटल लाकूड व एक लिटर रॉकेल आदी साहित्याचाच पुरवठा होतो. त्यावर केवळ ८७० रुपये खर्च होत असून प्रत्येक मृतदेहामागे १२२० रुपयांची बचत ठेकेदार करीत आहे, पण पालिकेकडून मात्र तो पूर्ण रक्कम उचलतो. वर्षभरात ठेकेदाराने सुमारे दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या सर्व प्रकाराला आरोग्य विभागाकडील अधिकारीही जबाबदार आहेत. त्यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार घडणे अशक्य आहे. त्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपायुक्तांना दिले आहेत. अंत्यविधी साहित्य पुरवठ्याची चौकशी करून, दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल. पालिकेला झालेल्या नुकसानीची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराचे बिल थांबविण्याची सूचना दिल्याचे कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)