शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सांगली बाजार समितीचे दहा माजी संचालक अपात्रच

By अशोक डोंबाळे | Updated: April 17, 2023 18:14 IST

पणन संचालकांचा दणका : प्रवास भत्त्यासह जमीन खरेदीतील घोटाळ्याचा ठपका: बाजार समितीच्या निवडणूकीतून दिग्गज पडले बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत दहा माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी अपात्र ठरविले आहेत. या निर्णयाविरोधात सर्वांनी पणन संचालकांकडे धाव घेत होती. पणन सहसंचालक मोहन निंबाळकर यांनी जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय कायम ठेवत सर्व दहा संचालकांना अपात्र केले आहे. दरम्यान, अपात्रतेच्या निर्णयामुळे बाजार समितीच्या निवडणुकीतून दिग्गज बाहेर पडल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गटाला धक्का बसला आहे.

सांगली बाजार समितीच्या १८ जागांसाठी विक्रमी ५९८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची छाननी मिरजेत उपनिबंधक सुरवसे यांच्या उपस्थितीत झाली होती. अनिल शेगुणसे यांनी दहा माजी संचालकांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. जमिन खरेदी, जागा भाड्याने देण्यामध्ये माजी संचालकांनी गैरव्यवहार केला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. यामुळे संतोष पाटील, प्रशांत शेजाळ, वसंत गायकवाड, दीपक शिंदे, अण्णासाहेब कोरे, अभिजित चव्हाण, मुजीर जांभळीकर, बाळासाहेब बंडगर आणि अजित बनसोडे आदी दहा माजी संचालकांचे अर्ज अवैध करण्याची मागणी केली होती. तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी दहा माजी संचालकांचे अर्ज अवैध केले होते.

जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयाविरोधात सर्व अपात्र संचालकांनी पणन संचालकांकडे धाव घेतली होती. पणन सहसंचालक मोहन निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. निंबाळकर यांनी सोमवारी दोन्ही बाजू समजून घेऊन जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांचा निर्णय कायम ठेवला आहे. सांगली बाजार समितीच्या सर्व दहा माजी संचालकांना अपात्र ठरविले आहे, अशी माहिती सहसंचालक मोहन निंबाळकर यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगली