शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील दंग्याचा न्यायालयाला ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांचा आरडाओरडाच अधिक होऊ लागला आहे. महिला सदस्यांसमोरच अर्वाच्च भाषेत उणीदुणी काढली जात आहेत. पण या दंग्याचा त्रास केवळ महापालिका अधिकाºयांनाच होतो असे नाही, तर पालिकेलगतच असलेल्या जिल्हा न्यायालयालाही होऊ लागला आहे. महापालिकेतील दंग्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडथळे येऊ लागले आहेत. याबाबत शुक्रवारी महासभेपूर्वी न्यायालयाकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांचा आरडाओरडाच अधिक होऊ लागला आहे. महिला सदस्यांसमोरच अर्वाच्च भाषेत उणीदुणी काढली जात आहेत. पण या दंग्याचा त्रास केवळ महापालिका अधिकाºयांनाच होतो असे नाही, तर पालिकेलगतच असलेल्या जिल्हा न्यायालयालाही होऊ लागला आहे. महापालिकेतील दंग्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडथळे येऊ लागले आहेत. याबाबत शुक्रवारी महासभेपूर्वी न्यायालयाकडून पालिकेला समजही देण्यात आली आहे.महापालिका व जिल्हा न्यायालयाची इमारत जवळजवळ आहे. त्यात महापालिकेच्या सभेचे सभागृह मुख्य इमारतीत तिसºया मजल्यावर मागील बाजूला असून, त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर तीन ते चार न्यायालये आहेत. महासभेत दंगा झाल्यास त्याचा आवाज अगदी न्यायालयापर्यंत पोहोचतो. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत तर गोंधळाने कळसच गाठला होता. महापौर विरुद्ध उपमहापौर गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. उपमहापौर गटाचे नेते शेखर माने, विजय घाडगे यांनी सभेच्या वैधतेबाबत त्या सभेत प्रश्न उपस्थित केला, तर महापौर गटातून नगरसेवक संतोष पाटील यांनी माळबंगला जागा खरेदीचा अहवाल सादर करण्याचा आग्रह धरला.यातून दोन्ही गटात धुमश्चक्री झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत सदस्यांची मजल गेली होती. एकेरीवर येत एकमेकांचे वैयक्तिक उट्टे काढत सभा संकेतही पायदळी तुडविले गेले. सभेत ध्वनिक्षेपक हाती घेऊन जोरजोरात आरडाओरडा झाला. त्यामुळे लगतच्या न्यायालयात कामानिमित्त आलेले पक्षकारही आश्चर्यचकित झाले होते. अनेक पक्षकार तर सभागृहालगत इमारतीजवळ उभे राहून पालिकेतील गोंधळ ऐकत होते.त्यात न्यायालयीन कामकाजही सुरू होते. पालिकेतील दंग्यामुळे या कामकाजातही अडथळे येत होते. त्याचा त्रास होत होता. सप्टेंबरमधील सभा रद्द करून शुक्रवार, दि. ६ आॅक्टोबर रोजी सभा घेण्यात आली.या सभेपूर्वीच न्यायालयात बंदोबस्तासाठी असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाºयाला पालिकेत पाठविण्यात आले होते. या पोलिस अधिकाºयाने आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन महासभेतील दंग्याचा त्रास न्यायालयाला होत असल्याची कल्पना दिली. उपायुक्त पवार यांनी महापौर हारुण शिकलगार यांच्या कानावर ही गोष्ट घातली.त्यामुळे शुक्रवारच्या सभेत महापौरांनी कमी आवाजात बोलण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रशासनाने सभागृहाचे दरवाजे, खिडक्या बंद करून घेतल्या. महापालिकेतील गोंधळ न्यायालयापर्यंत जाऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली.