शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील दंग्याचा न्यायालयाला ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 12:55 IST

सांगली महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांचा आरडाओरडाच अधिक होऊ लागला आहे. महिला सदस्यांसमोरच अर्वाच्च भाषेत उणीदुणी काढली जात आहेत. पण या दंग्याचा त्रास केवळ महापालिका अधिकाºयांनाच होतो असे नाही, तर पालिकेलगतच असलेल्या जिल्हा न्यायालयालाही होऊ लागला आहे. महापालिकेतील दंग्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडथळे येऊ लागले आहेत. याबाबत शुक्रवारी महासभेपूर्वी न्यायालयाकडून पालिकेला समजही देण्यात आली आहे.

ठळक मुद्देचर्चेपेक्षा आरडाओरडाच अधिक न्यायालयीन कामकाजात अडथळे, पालिकेस समजप्रसंगी कारवाईची शक्यता

सांगली, 9 : महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांचा आरडाओरडाच अधिक होऊ लागला आहे. महिला सदस्यांसमोरच अर्वाच्च भाषेत उणीदुणी काढली जात आहेत. पण या दंग्याचा त्रास केवळ महापालिका अधिकाºयांनाच होतो असे नाही, तर पालिकेलगतच असलेल्या जिल्हा न्यायालयालाही होऊ लागला आहे. महापालिकेतील दंग्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडथळे येऊ लागले आहेत. याबाबत शुक्रवारी महासभेपूर्वी न्यायालयाकडून पालिकेला समजही देण्यात आली आहे.

महापालिका व जिल्हा न्यायालयाची इमारत जवळजवळ आहे. त्यात महापालिकेच्या सभेचे सभागृह मुख्य इमारतीत तिसºया मजल्यावर मागील बाजूला असून, त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर तीन ते चार न्यायालये आहेत. महासभेत दंगा झाल्यास त्याचा आवाज अगदी न्यायालयापर्यंत पोहोचतो. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत तर गोंधळाने कळसच गाठला होता. महापौर विरुद्धउपमहापौर गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. उपमहापौर गटाचे नेते शेखर माने, विजय घाडगे यांनी सभेच्या वैधतेबाबत त्या सभेत प्रश्न उपस्थित केला, तर महापौर गटातून नगरसेवक संतोष पाटील यांनी माळबंगला जागा खरेदीचा अहवाल सादर करण्याचा आग्रह धरला.

यातून दोन्ही गटात धुमश्चक्री झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत सदस्यांची मजल गेली होती. एकेरीवर येत एकमेकांचे वैयक्तिक उट्टे काढत सभा संकेतही पायदळी तुडविले गेले. सभेत ध्वनिक्षेपक हाती घेऊन जोरजोरात आरडाओरडा झाला. त्यामुळे लगतच्या न्यायालयात कामानिमित्त आलेले पक्षकारही आश्चर्यचकित झाले होते. अनेक पक्षकार तर सभागृहालगत इमारतीजवळउभे राहून पालिकेतील गोंधळ ऐकत होते. त्यात न्यायालयीन कामकाजही सुरू होते. पालिकेतील दंग्यामुळे या कामकाजातही अडथळे येत होते. त्याचा त्रास होत होता. सप्टेंबरमधील सभा रद्द करून शुक्रवार, दि. ६ आॅक्टोबर रोजी सभा घेण्यात आली.

या सभेपूर्वीच न्यायालयात बंदोबस्तासाठी असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाºयाला पालिकेत पाठविण्यात आले होते. या पोलिस अधिकाºयाने आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन महासभेतील दंग्याचा त्रास न्यायालयाला होत असल्याची कल्पना दिली.

उपायुक्त पवार यांनी महापौर हारुण शिकलगार यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यामुळे शुक्रवारच्या सभेत महापौरांनी कमी आवाजात बोलण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रशासनाने सभागृहाचे दरवाजे, खिडक्या बंद करून घेतल्या.महापालिकेतील गोंधळ न्यायालयापर्यंत जाऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली.

प्रसंगी कारवाईची शक्यताशुक्रवारच्या तहकूब सभेला उपमहापौर गट नसल्याने सुरूवातीला काहीकाळ वादावादीचा प्रसंग वगळता सभा शांततेत पार पडली. त्यात महापालिकेची निवडणूक दहा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सभागृहात छाप पाडण्यासाठी दंगा करणाºयांची संख्याही वाढणार आहे. पण विनाकारण दंगा घालून चालणार नाही. भविष्यात महापालिकेच्या दंग्याचा न्यायालयीन कामकाजात अडसर ठरल्याससंबंधितांवर कारवाई होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.