आष्टा : आघाडी सरकारच्या विचारांचा मी आमदार असल्याने संस्थाचालक, शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. भविष्यात पेन्शनचा प्रश्न असो, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा प्रश्न असो किंवा अन्य सर्व प्रश्न यांसाठी लढा उभारण्यासाठी मला आपण सर्वांनी नेहमीच साथ द्यावी, असे आवाहन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.
आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलास आमदार जयंत आसगावकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. सचिव अॅड. चिमण डांगे यांनी त्यांचे स्वागत केले.
पाहुण्यांचा परिचय प्राचार्य शंकर पाटील यांनी करून दिला. संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, उपाध्यक्ष अॅड. संपतराव पाटील, खजीनदार विठ्ठलराव मुसाई, व्यवस्थापक सुनील शिनगारे यांच्यासह उदय पाटील, संजय पाटील, सुभाष पाटील, डॉ. सत्येंद्र ओझा, प्रा. शैलेंद्र हिवरेकर, प्रा. संतोष मोहिते उपस्थित होते.
फोटो : २८०१२०२१-आयएसएलएम- आष्टा सत्कार न्यूज
आष्टा येथे आ. जयंत आसगावकर यांचा सत्कार अॅड. चिमन डांगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अॅड. संपतराव पाटील, प्राचार्य सुभाष पाटील, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, विठ्ठलराव मुसाई उपस्थित होते.