शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शिक्षक बँकेच्या सभेत धक्काबुक्की

By admin | Updated: September 5, 2016 00:15 IST

जोरदार घोषणाबाजी : दोन मिनिटांत सभा गुंडाळून सत्ताधाऱ्यांचा पळ

सांगली : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत रविवारी धक्काबुक्कीचे गालबोट लागले. सभेत सत्ताधारी व विरोधक एकमेकांशी भिडले. या गोंधळातच विरोधी संचालक व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, संचालक महादेव हेगडे, माजी अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. या अभूतपूर्व गोंधळातच सत्ताधारी शिक्षक समितीने अवघ्या दोन मिनिटातच सभा गुंडाळून सभागृहातून पळ काढला. शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा येथील दीनानाथ नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून बँकेचे कार्यक्षेत्र विस्तार, तीन टक्के लाभांश, ब वर्ग नाममात्र सभासद या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. त्यातून सभेपूर्वी वातावरण चांगलेच तापले होते. रविवारी सभेच्या एक तास आधीपासूनच सत्ताधारी व विरोधकांत घोषणायुद्ध रंगले होते. विरोधकांची संख्या अधिक असल्याने पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांचा आवाज कमी दिसत होता. त्यात सत्ताधारी गटाच्या महिलांनी विरोधकांविरोधात घोषणाबाजीत मोर्चा सांभाळला होता. तब्बल तासभर सभागृहात दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होती. सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी साडेअकरा वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन (करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष यु. टी. जाधव स्वागत व प्रास्ताविक करण्यास उभे राहिले. प्रास्ताविक सुरू असतानाच विरोधक मोकळ्या जागेत जमा होऊन ध्वनीक्षेपकाची मागणी करू लागले. त्यातून मोठा गोंधळ उडाला. या गोंधळातच अध्यक्ष जाधव यांनी प्रास्ताविक व विषयपत्राचे वाचन संपवून घेतले. अवघ्या दोन मिनिटातच मंजूर-मंजूरच्या घोषणा देत त्यांच्यासह सत्ताधारी गटाच्या संचालकांनी व्यासपीठ सोडले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. याचवेळी बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिक्षक संघाच्या पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, श्रीकांत पवार या दोघांना सत्ताधारी समर्थकांनी धक्काबुक्की केली. दोन्ही गट हातघाईवर येताच पोलिसही धावले. या प्रकारामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी समांतर सभा घेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी शिंदे यांच्यासह संचालक महादेव हेगडे यांना सत्ताधाऱ्यांनी व्यासपीठावरून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला. एका संचालकानेच शिंदे यांना धक्का दिल्याचे सांगण्यात आले. यानंतर संबंधित संचालकांच्या अंगावर शिक्षक संघाचे कार्यकर्ते धावून गेले. तब्बल अर्धा तास सभागृहात गोंधळ सुरू होता. (प्रतिनिधी) ----------- कोट बँकेची सभा सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळाला सुरूवात केली होती. आम्ही सर्व प्रश्नांना उत्तर देणार होतो. पण विरोधकांनी सभेत गोंधळ घालून विस्कळीतपणा आणला. संचालक विनायक शिंदे हे व्यासपीठावरूनच समर्थकांना चिथावणी देत होते. सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे पुन्हा बँकेत सत्ता मिळणार नाही, याची भीती विरोधकांना होती, म्हणूनच त्यांनी गोंधळ घातला. - यु. टी. जाधव, अध्यक्ष, शिक्षक बँक ---------------- कोट शिक्षक समितीने बँकेत सत्ता हाती घेतल्यापासून पारदर्शी कारभार केला आहे. समितीचा कारभार चांगला असल्याने सभासदांतही समाधान आहे. त्यामुळे भविष्यात बँकेच्या सत्तेजवळही आपण पोहोचू शकणार नाही, या भीतीतून विनायक शिंदे व समर्थकांनी गोंधळ घातला. त्यांच्याकडूनच सभा उधळण्याचा प्रयत्न झाला. त्यांचे वर्तन अशोभनीय आहे. - किरण गायकवाड, राज्य उपाध्यक्ष, शिक्षक समिती ------------------- चौकट बँकेचे अध्यक्ष यु. टी. जाधव व विरोधी संचालक विनायक शिंदे यांनी मिलीभगत करून सभा गुंडाळली. बँकेच्या पोटनियम दुरुस्तीला आमचा विरोध असून सभेतील ठरावांविरोधात न्यायालयात जाणार आहोत. बँकेवर प्रशासक नियुक्त करून भ्रष्ट कारभार व नोकर भरतीची चौकशी करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे करणार आहोत. - विकास शिंदे, अध्यक्ष, तरुण मंडळ. --------------- ०४ एसएन०१- सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्षक समिती व शिक्षक संघात जोरदार वादावादी झाली. यावेळी ठराव मंजुरीला संघाच्या समर्थकांनी विरोध दर्शविला. सत्ताधाऱ्यांनी पळ काढला : विनायक शिंदे सत्ताधाऱ्यांना कार्यक्षेत्र वाढ, ब वर्ग सभासद या मुद्द्यावर आम्ही जाब विचारणार होतो, पण त्यांच्याकडे एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यासाठी त्यांनी सभा गुंडाळून पळ काढला. बँकेची आजची सभा झालेलीच नाही. एकही विषय मंजूर झालेला नाही. बँकेच्या इतिहासात असा प्रकार कधीच घडलेला नव्हता. याविरोधात आम्ही सभासदांच्या सह्यांची मोहीम राबवून जिल्हा उपनिबंधक व सहकार आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत. ही सभा पुन्हा घ्यावी, अशी मागणीही आम्ही करणार आहोत. सभेत शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी सांगितले.