शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या कचाट्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:44 IST

शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना त्रुटीवर पर्याय न शोधल्याने भरती प्रकियेतील अडथळे काही दूर होताना दिसत नाहीत. ब्रीज कोर्सची अट, मागासवर्गीयांच्या कमी जागा आणि इंग्रजी माध्यमांच्या डी. एड्. धारकांच्या प्रश्नावर तरुणांनी न्यायालयात दाद मागितली असून, आता यावरील निकालानंतरच भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देन्यायालयाच्या कचाट्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया रखडलीडी. एड्. धारकांच्या प्रश्नावर तरुणांनी मागितली न्यायालयात दाद

सांगली : शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना त्रुटीवर पर्याय न शोधल्याने भरती प्रकियेतील अडथळे काही दूर होताना दिसत नाहीत. ब्रीज कोर्सची अट, मागासवर्गीयांच्या कमी जागा आणि इंग्रजी माध्यमांच्या डी. एड्. धारकांच्या प्रश्नावर तरुणांनी न्यायालयात दाद मागितली असून, आता यावरील निकालानंतरच भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरती सुरू झाली असली तरी शासनाकडून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला नसल्याने डी. एड्., बी. एड्.धारकांत अस्वस्थता आहे. एकतर सुरुवातीला २४ हजार जागांवरील भरती घोषित करून प्रत्यक्षात १० हजारांवरच जागांची प्रक्रिया राबविण्यात आल्याने तरुणांत संताप आहे.शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असतानाच, काही घटकांवर अन्याय झाल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

यासंदर्भात एकूण तीन याचिका दाखल असल्याचे समजते. त्यानुसार ज्या बी. एड्.धारकांना १ ली ते पाचवीसाठी काम करावयाचे आहे, त्यांनी ब्रीज कोर्स पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. सेवेत असताना हा कोर्स करता येत असल्याने नोकरीच्या अगोदरच हा कोर्स कसा करणार? असा सवाल बी.एड्.धारकांनी उपस्थित केला आहे.मागासवर्गीय प्रवर्गातील ५० टक्के जागांची कपात करण्यात आली आहे. यामुळे भरतीसाठी लागणारे मेरीट वाढणार असून, सर्वच प्रवर्गाला याचा फटका बसणार आहे. त्यामुळे बिंदूनामावलीत जो काही बदल करावयाचा तो करून ५० टक्के जागा आत्ताच भरण्याची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या प्रकरणात इंग्रजी माध्यमातून डी.एड्. केलेल्या उमेदवारांसाठी पूर्वी २० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आता भरती प्रक्रिया राबविताना या २० टक्के जागा कपात करण्यात आल्या आहेत. याबाबत न्यायालयाने अंतरिम निकाल देताना २० टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देश दिले असले तरी त्याचा अंतिम निकाल अपेक्षित आहे.आचारसंहितेआधी भरती पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने तरुणांत संतापाची भावना आहे.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीSangliसांगली