शिराळा : शिराळा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील दहा लाख रुपये वसुली पंचायत समिती भरारी पथकाने केली. यावेळी ६० पाणी पुरवठा नळ कनेक्शनही तोडण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी दीपाली पाटील यांनी दिली.त्यांनी सांगितले की, ए. यु. पाटील, व्ही. पी. काळे, ए. के. साळुंखे, एस. एल. सावंत, यु. जे. पाटील, ए. ए. वडार, एस. एच. चौगुले या प्रमुखांसह ही भरारी वसुली पथके स्थापन करण्यात आली होती. ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी या योजनेतून उपलब्ध होऊन ग्रामपंचायतींना विकास कामांना चालना देण्याच्या दृष्टीने वाढीव मुदत देण्यात आली आहे. पथकाद्वारे मणदूर (७५५0), गुढे (६८३२), पावलेवाडी (६८२५), औंढी (१५३४४), करमाळा (२३६९0), कोकरुड (७१२९0), बिळाशी (२१३४९), फुपीरे (११0८0), टाकवे (१५८६0), शिराळा (९४00), खेड (१५000), पाचगणी (२४७८0), नाठवडे (२५000), सागाव (३३000), वाकुर्डे बुद्रुक (१७४१६), मांगले (१८७६00), इंग्रुळ (५५000), रेड (२५000), मेणी (११0९0), वाकाईवाडी (२६000), मोहरे (३0३0१), कणदूर (५७000), आरळा (९२0२८), मांगरुळ (४१९३४), शिरसी (२0१000), खिरवडे (४२६0३), भैरववाडी (१९000) अशी ९ लाख ९६ हजार ६७२ रुपये वसूल केले. यावेळी नाठवडे (५), इंग्रुळ (२४), रेड (१९), कणदूर (१0), शिरसी (१) अशी साठ नळकनेक्शन तोडण्यात आली, असे सांगितले. (वार्ताहर)
शिराळा तालुक्यात करवसुली जोमात
By admin | Updated: February 13, 2015 22:58 IST