शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

तासगाव तालुक्यात अवैध धंदे जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 00:14 IST

यंत्रणेचे दुर्लक्ष : दारू, गुटख्याची खुलेआम विक्री; कठोर कारवाईची गरज

तासगाव : तासगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरासह गावागावात खुलेआम दारू, गुटख्याची विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या ढाब्यांतूनही बेकायदेशीरपणे दारूची विक्री होत आहे. मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून, दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे.तासगाव तालुक्यात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात अवैध धंद्यांना लगाम बसला होता. त्यामुळे तालुक्यात अपवादानेच बेकायदा धंदे सुरू असल्याचे दिसून येत होते. मात्र वर्षभरापासून तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदा धंदेवाल्यांनी तोंड वर काढले आहे. तासगाव शहरासह तालुकाभरात बेकायदा धंदे दिवसेंदिवस जोमाने सुरु असल्याचे चित्र आहे. तासगाव शहरातील काही टपऱ्यांवर खुलेआमपणे दारूची विक्री होत आहे. शहराबरोबरच विटा रस्ता, सांगली रस्ता, भिवघाट रस्त्यासह इतर ठिकाणी असलेल्या ढाब्यांवरदेखील खुलेआमपणे बेकायदा दारूची विक्री होत आहे. काही गावात बेकायदा दारूविक्रेत्यांनीही तासगाव शहरात चांगलेच बस्तान बसवल्याचेही चित्र आहे. बेकायदा दारू विक्रीबरोबरच तालुक्यात गुटखा, पेट्रोलचीही बेकायदेशीरपणे विक्री होत आहे. अनेक गावांत काही पानटपऱ्या,दुकानांतून पेट्रोल, गुटख्याची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. बेकायदेशीरपणे होणाऱ्या दारू, पेट्रोल आणि गुटख्याच्या विक्रीचे दरही बेकायदेशीर आहेत. दीडपट ते दुप्पट दराने याची खुलेआमपणे विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर धंदे खुलेआमपणे सुरु असताना कारवाई झाल्याचे चित्र कोठेचे दिसून येत नाही. संबंधित गावची जबाबदारी असणाऱ्या बीट अंमलदारांना, बेकायदा धंद्यांची माहिती असूनदेखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. पोलिस विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील अवैद्य धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याने चित्र आहे. काही पोलिसांची चिरमिरीची वृत्तीच याला कारणीभूत असल्याची चर्चा असून, काही पोलिस कर्मचारी या अवैध विक्रेत्याकडून वरकमाईत गुंतलेले दिसतात. एखाद्या महिन्याला एखाद्याची तासगाव वारी चुकली, तर दुसऱ्या महिन्यात दोन हजार रुपये द्यावे लागत असल्याची चर्चा आहे. एकूणच या साऱ्या प्रकारामुळे शहरात अवैध व्यवसाय जोमात असल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. याला लगाम घातला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.ढाब्यावर खाकी : तरीही विक्री तालुक्यात बेकायदा दारू विक्री होणाऱ्या ढाब्यांवर दौऱ्याच्या निमित्ताने काही ‘खाकी’ वर्दीवाल्यांची वर्दळ असते. त्यावेळी या ठिकाणी खाण्या-पिण्याचा कार्यक्रमही रंगलेला असतो. अनेकदा त्यासाठी स्पॉन्सर असतो. किंंबहुना ढाबेवाल्यांकडूनच खूश केले जात असल्याचे चित्र दिसून येत असून, अशा वागणुकीची नागरिकांत खुलेआम चर्चा सुरु आहे.महिन्याला हजार रुपये गावा-गावात अनेक ठिकाणी बेकायदा दारु विक्री सुरु आहे. या ठिकाणांची आणि सर्वच बेकायदा अड्ड्यांची माहिती खाकीतील काही कारभाऱ्यांना आहे. अशाच एका खाकीवाल्याकडून प्रत्येक महिन्याला न चुकता दारु विक्रेत्यांकडून एक हजार रुपयांचा मलिदा बेकायदा घेतला जातो. पोलिस ठाण्याच्या आवारापासून लांब अंतरावर असे व्यवहार होत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.