शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘बाल विकास’च्या कारभारावर सदस्यांचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर सर्व सदस्यांनी प्रचंड ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली. या विभागाच्या ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर सर्व सदस्यांनी प्रचंड ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली. या विभागाच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे सभागृहात वादंग माजले. दरम्यान, सभापती शुभांगी पाटील यांनी चौथी आणि सातवीच्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणेच सुरू कराव्यात, अशी मागणी केली.

पंचायत समितीच्या सभागृहात सभापती शुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरी आलेली सानिका निवास शिंदे (वाटेगाव) आणि बारावी आलेली आदिती विजय पाटील (ऐतवडे खुर्द) या मुलींचा सत्कार करण्यात आला. जागतिक पुरस्कार मिळविणारे सोलापूरचे शिक्षक रणजित डिसले यांच्या अभिनंदनाचा ठराव रूपाली सपाटे यांनी मांडला.

सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी, पंचायत समिती आवारात होत असलेल्या पाण्याच्या नासाडीचा व्हिडीओ दाखवत प्रशासनाला जाब विचारला. आवारातीलच अशा महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील १०६ पैकी १०१ शाळा सुरू आहेत. वाहतूक व्यवस्थेला परवानगी नसल्याने ५ शाळा बंद आहेत. तालुक्यातील कामेरी १ व २, कासेगाव १ व २, बागणी १ व २ आणि महादेवनगर या जि. प. शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करणार असल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्याधिकाऱ्यांनी तालुक्यात २० कोरोनाचे रुग्ण उपचाराखाली असल्याचे सांगितले.

बावची आरोग्य केंद्रातील ५ आशा सेविकांची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकामच्या चर्चेवेळी शंकरराव चव्हाण यांनी, रस्त्याकडेच्या झाडीमुळे अपघात होतात, याकडे लक्ष वेधत, रस्ते सुविधा चांगल्या ठेवा, अशी सूचना केली. धनश्री माने यांनी, ऐतवडे बुद्रुक परिसरातील निकृष्ट रस्ते पुन्हा करण्याची मागणी केली. रूपाली सपाटे यांनी ताकारी-इस्लामपूरच्या, तर शुभांगी पाटील यांनी वाटेगाव परिसरातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला. सभेत देवराज पाटील, आनंदराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले.