मराठा साम्राज्याचे पेशवेकालीन सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यानी १७७९ मध्ये या ऐतिहासिक रथोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत गेली २४१ वर्षे अव्याहतपणे रथोत्सवाची ही परंपरा सुरू आहे. तासगावचा गणपती हा दीड दिवसांचा असतो. या गणपतीची विसर्जन मिरवणूक म्हणजेच रथोत्सव होय. यासाठी कर्नाटक, महाराष्ट्रासह, सीमाभागातून हजारो गणेशभक्त हजेरी लावतात.
यंदा कोरोनामुळे शहरासह ग्रामीण भागात उत्साह कमी आहे. तासगाव संस्थानच्या गणपतीची दीड दिवसाची ऐतिहासिक परंपरा आहे. गणपतीच्या स्थापनेनंतर दुसऱ्याचदिवशी विसर्जन करण्यात येते. या दिवशीचा रथोत्सवही ऐतिहासिक असतो. हजारो भाविक या रथोत्सवास येतात. मात्र कोरोनामुळे साध्या पद्धतीने पूजा करत आजचा ऐतिहासिक रथोत्सव रद्द करण्यात आला आहे.
चाैकट
गणेश मंदिरात आकर्षक सजावट
गणेशोत्सवासाठी तासगावच्या ऐतिहासिक गणेश मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. संस्थानच्या गणपतीची पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.